Bjp : गिरीश महाजन म्हणाले, काॅंग्रेसचा आक्षेप म्हणजे बालिशपणाचे लक्षण

निवडणुक आयोगाने काॅंग्रेसचे आक्षेप फेटाळले असले तरी आता आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याची भूमिका काॅंग्रेसने घेतली आहे. (Girish Mahajan)
Bjp Mla Girish Mahajan
Bjp Mla Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या आजारी आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काॅंग्रेसने (Maharashtra) आक्षेप नोंदवला होता. राज्य निवडणुक आयोगाने हे आक्षेप फेटाळून लावले. परंतु काॅंग्रेसच्या या आक्षेपांमुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोघांच्याही मत पत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा आक्षेप काॅंग्रेसच्या वतीने राज्य निवडणुक आयोगाकडे घेण्यात आला होता. या आक्षेपानंतर (Bjp) भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी हा आक्षेप म्हणजे काॅंग्रेसच्या बालिशपणाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडावी, यासाठी काॅंग्रेसने केलेला हा खोडसाळपणा असल्याचेही महाजन म्हणाले. विधान परिषदेच्या १० जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पाच उमेदवार दिल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

राज्य सभेप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप चमत्कार घडवणार की मग महाविकास आघाडीची एकजूट दिसणार? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुपारी मतदान झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी सुरू होणार होती. परंतु भाजपचे आजारी आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काॅंग्रेसच्या वतीने आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे मतमोजणीला उशीर झाला.

निवडणुक आयोगाने काॅंग्रेसचे आक्षेप फेटाळले असले तरी आता आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याची भूमिका काॅंग्रेसने घेतली आहे. दरम्यान, या प्रकारावर भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य करत काॅंग्रेवर टीका केली आहे. महाजन म्हणाले, टिळक आणि जगताप यांच्या मतपत्रिका अनुक्रमे त्यांचे पती आणि भावाने मतपेटीत टाकल्या. यासाठी तीन दिवासंपुर्वीच निवडणुक आयोगाकडून आम्ही परवनागी घेतली होती.

Bjp Mla Girish Mahajan
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत हितेंद्र ठाकूरांचे मोठे वक्तव्य!

राज्यसभा निवडणुकीत देखील याच पद्धतीने टिळक आणि जगताप यांचे मतदान झाले होते. निवडणुक अधिकाऱ्यांनी परवानगी असल्यामुळेच टिळक व जगताप यांचे मदतनीस म्हणून त्यांचे पती आणि बंधु यांना मतपत्रिका दिल्या होत्या. परवनागी नसती तर निवडणुक अधिकाऱ्यांनी त्यांना मतपत्रिकाच दिल्या नसत्या.

पण केवळ डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने मतमोजणी प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी काॅंग्रेसने केलेला हा बालिश आणि खोडसाळ प्रकार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने काॅग्रेचा आक्षेप फेटाळ्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोगाची बैठक सुरू आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतरच मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com