ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले ; आम्ही घाबरत नाही!

आशिष शेलार (ashish shelar) यांनी राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्यावर हल्लाबोल केला.
ashish shelar
ashish shelarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत, हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेऊन पोलिसांमार्फत चौकशी करावी,'' अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली. पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी शेलारांनी राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्यावर हल्लाबोल केला.

"नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत म्हणजे.. कबूल.. कबूल.. कबूल.. असा कबुलीनामा होता,'' अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. ते म्हणाले, ''अंडरवर्ल्डशी असलेले संबंध झाकण्यासाठी मलिक चांडाळचौकडी करत आहेत. आमची हयात विरोधी पक्षात गेली. आम्ही घाबरत नाही. नवाब मलिक यांना फटाके भिजलेले दिसले. पण त्यांचा चेहरा घामाने भिजलेला असल्याचं दिसलं. सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत.''

''देवेंद्र फडणवीस यांनी एकुण चार आरोप केले. त्यापैकी पहिला सरदार शहावल्ली हा मुंबईच्या 93 च्या बाँम्ब मधील शिक्षापात्र आरोपी असून त्याच्याशी नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार झाले. दुसरा आरोप महमद सलिम पटेल हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा ड्रायव्हर व फ्रंट मँन, पाँवर आँफ पँटर्नी होल्डर आणि अटक झालेला आरोपी यांच्या मार्फत व्यवहार करुन फायदा करुन दिला, तिसरा आरोप मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपीं जे टाडा खाली अटक झाले त्या आरोपींची जी जमीन सील होणार सरकार जमा होईल म्हणून त्यांना मदत करण्यासाठी त्यांची जमीन स्वतःकडे वळवली, घेतल्याचे दाखवली. चौथा आरोपींची जमीन कवडीमोल किंमतीने घेऊन त्यांचा फायदा केला. यातील तीन आरोप नवाब मलिक यांनी कबूल केले आणि हसीना पारकर या विषयात बोलण्याची हिंम्मत नसल्याने त्याबद्दल मौन राखून तो आरोप कबूल केला,'' असे शेलारांनी सांगितले.

ashish shelar
यूपीची निवडणूक मोदी-शहांनी गंभीरतेने घेतलीय..अधिकाऱ्यांना दिलयं टार्गेट

''मुंबईततील हे कसले "नवाबी भाडेकरु ?" ज्यांना सरकारी दरापेक्षा कमी दरात जागेची मालकी मालकाने दिली. मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा,'' अशी उपरोधिक मागणी आशिष शेलारांनी केली.मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आज सुध्दा सरकार रेडीरेकनरच्या 25% रक्कम जमा करुन घेते मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली, असा सवाल करीत आशिष शेलार यांनी या व्यवहारातील सांगितल्या जाणाऱ्या बाबी समोर आणल्या. या व्यवहारात सरदार शहावल्ली याचे वडील वाँचमेन असल्याने त्यानी आपले नाव जागेला चढवले म्हणून त्याला पैसै दिले हे मग हा मुंबईतील वाचमनला नवा नवाबी धंदा सांगताय का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक सांगत असलेल्या नवाबी दर, नवाबी धंदे, नवाबी व्यवहार, नवाबी भाडेकरु, नवाबी मालक याची खिल्ली उडवली. हा विषय एवढा सरळ नसून मुंबईला 1993 ला बाँम्ब स्फोट झाले आणि त्यातील दोषी आरोपींना मदत करण्यासाठी 2005 ला हे व्यवहार झालेले असल्याने हा विषय गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी कराली अशी मागणी सुध्दा शेलार यांनी केली. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय उपाध्याय, भाजप नगरसेवक संदिप लेले उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com