"लवकरच चांगली-वाईट बातमी मिळेल..." : बाळा नांदगावकरांनी सस्पेन्स वाढवला

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' (Maharashtra navnirman sena) पक्ष एकटा लढणार की युतीत?
bala-nandgaonkar-Raj-Thakre
bala-nandgaonkar-Raj-ThakreSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' (Maharashtra navnirman sena) पक्ष एकटा लढणार की युतीत? या प्रश्नावर उत्तर देताना बाळा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सस्पेन्स वाढवला आहे. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शिवथीर्थ बंगल्यावर मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीस अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत लवकरच चांगली-वाईट बातमी मिळेल असे म्हटले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, आजच्या बैठकीत आगामी निवडणूका आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा याबाबत चर्चा झाली. मुंबईबाबत पण चर्चा झाली. त्याबाबतही बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. ६ डिसेंबरला पुण्यात एक छोटी बैठक आहे. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादला होणार आहे. त्यानंतर १६ डिसेंबरला पुन्हा पुण्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आली आहे. तर, कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित आहे, मात्र अद्याप तारीख ठरलेली नाही. तसेच उत्तर महाराष्ट्राची बैठक जळगावला आणि विदर्भातील अमरावती, नागपूर विभागाचीही बैठक होणार आहे, असेही नांदगावकरांनी स्पष्ट केले.

bala-nandgaonkar-Raj-Thakre
धक्कादायक : ऑक्सिजन अभावी किती मृत्यू ; ठाकरे सरकार म्हणतं, 'माहित नाही'

याच निवडणूकांच्या अनुषंगाने बाळा नांदगावकर यांना आगामी निवडणूकांमध्ये मनसेची वाटचाल कशी असणार, युती होणार का? याबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, आता पर्यंतच्या निवडणूका आम्ही एकला चलो रे याच भूमिकेतून लढवल्या आहेत. पुढे काय होईल हे माहित नाही. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील. पण सध्यातरी आमची भूमिका ही एकटा जीव सदाशिव अशीच आहे, त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. पण लवकरच आपल्याला काहीतरी चांगली वाईट बातमी मिळेल असे म्हणत नांदगावकर यांनी आगामी निवडणूकांमध्ये मनसे-भाजपची युती होणार की नाही याबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे.

bala-nandgaonkar-Raj-Thakre
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली शरद पवारांची भेट...

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधान

मागच्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांशी राज ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये भाजप-मनसे युती होणार असल्याच्या (BJP- MNS) चर्चांनी जोर धरला आहे. आधी चंद्रकांत पाटील यांची दोनदा भेट, त्यानंतर आशिष शेलार यांची भेट झाली होती.

त्यानंतर मागच्या आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. अमृता फडणवीस या देखील त्यांच्यासोबत होत्या. वरवर ही कौटुंबिक भेट असल्याचे म्हटले गेले पण या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता व्यक्त केली गेली. आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे भेट महत्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com