Raosaheb Danve Diwali News : रावसाहेब दानवे फडणवीसांना सुतळी बाॅम्ब का म्हणाले ?

BJP Political : या सुतळी बाॅम्बचे चटके दानवेंनाही बसलेत की काय ? अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे.
Raosaheb Danve Diwali News
Raosaheb Danve Diwali NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP News : राजकारणातील हजर जबाबी आणि आपल्या ग्रामीण शैलीसाठी ओळखले जाणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवाळीनिमित्त राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. (BJP) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानवे यांनी राजकीय नेत्यांच्या कार्यशैलीप्रमाणे फटाके निवडत त्यांचे वर्णन करत धमाल उडवून दिली.

Raosaheb Danve Diwali News
Congress vs Bjp : "...म्हणून भाजपवर राम... राम... करण्याची वेळ"; फडणवीसांना थोरातांचा टोला

महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सुतळी बाॅम्बसारखे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. आता दानवे यांनी फडणवीसांचा उल्लेख सुतळी बाॅम्ब असा का केला असेल असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे, तर (Raosaheb Danve) दानवे यांच्या दाव्यानुसार देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुतळी बाॅम्बसारखे आहेत, जे कधी कुणावर पडतील आणि त्याचे नुकसान करतील हे सांगता येत नाही.

राज्याच्या राजकारणात याची प्रचिती अनकेदा आली आहे. (BJP) दानवे यांनी फडणवीसांचा सुतळी बाॅम्ब असा केलेला उल्लेख किती योग्य आहे ते अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी, शिवसेनेसह अपक्ष व इतर छोट्या-मोठ्या पक्षांच्या आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा केलेला प्रवास हे पाहता फडणवीस खरंच सुतळी बाॅम्बसारखे कधी कुणावर जाऊन फुटतील याचा नेम नाही.

फडणवीस यांच्या राजकीय खेळीने राज्यातील दोन प्रस्थापित पक्ष आज विखुरले आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या दोघांची जी अवस्था आज राज्यात झाली आहे, त्याला राजकारणातील हा सुतळी बाॅम्बच कारणीभूत आहे. आता रावसाहेब दानवे यांनी फडणवीसांचा सुतळी बाॅम्ब असा उल्लेख कशामुळे केला? सध्या भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका आणि या सुतळी बाॅम्बचे चटके दानवेंनाही बसलेत की काय ? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख दानवे यांनी फुसका फटाका असा केला आहे. नुकताच मुंब्रा येथील शिवसेना शाखेचा वाद आणि त्यावर दोन्ही सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे निर्माण झालेला प्रसंग याचा संदर्भ जोडत दानवे यांनी ठाकरेंवर हा बाण सोडला की काय ? अशीही चर्चा होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com