BJP Vs Vijay Wadettiwar : 'विजय वडेट्टीवार अदानी बद्दल बोलताना तुमचे मालक...? ' ; भाजपने प्रत्युत्तर देत लगावला टोला!

BJP Vs Congress on Gautam Adani : 'आज ती काँग्रेस भाजपला कोणत्या तोंडाने प्रश्न विचारते?' असा पलटवारही भाजपे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांवरून काँग्रेसवर केला आहे.
BJP, Vijay Wadettiwar,Gautam Adani
BJP, Vijay Wadettiwar,Gautam AdaniSarkarnama
Published on
Updated on

BJP reply to Vijay Wadettiwar Allegations विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील जमिनी अदानीच्या घशात घातल्या जात आहे, असं म्हणत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ज्यावर भाजपकडूनही वडेट्टीवारांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपने ट्वीटद्वारे वडेट्टीवारांवर अदानींवरून प्रश्नांची सरबत्ती करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपने म्हटले आहे की 'अदानीचे शेअर्स विकत घेऊन जगणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अदानी बद्दल विचारू नये. विजय वडेट्टीवार अदानीबद्दल बोलताना तुमचे मालक रॉबर्ट वाड्रा यांची परवानगी घेतली का...? बऱ्याच प्रकल्पात काँग्रेसचे जावई अदानी सोबत पार्टनर म्हणून दिसतात.. याच उत्तर आहे का विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar).?'

BJP, Vijay Wadettiwar,Gautam Adani
Vijay Wadettiwar News : 'मुंबई अदानीच्या घशात घातली जातेय', म्हणत वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप!

अदानीवरून भाजपची वडेट्टीवारांवर प्रश्नांची सरबत्ती -

बालबुद्धी राहुल गांधींचे(Rahul Gandhi) महाराष्ट्रातील गुलाम विजय वडेट्टीवार यांनी सांगावं मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील ( भारत नगर ) जमीन आणि झोपड्या जमीनदोस्त करून 2005 - 6 मध्ये अदानी समुहाला दिली ती कोणाच्या माध्यमातून दिली? 2005 - 6 ला कुणाचे सरकार राज्यात आणि केंद्रात होते? राहुल गांधी यांचे जिजा, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि उद्योगपती अदानी यांच्यात कोणते संबंध आहेत? ते कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत? ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले?

तसेच, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गौतम अदानी(Gautam Adani) सोबत काय करत आहेत? शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत? का वारंवार गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला जातात? शरद पवारांच्या काही संस्थाना अदानी कडून किती देणगी दिली जाते? 2013 मध्ये महाराष्ट्रातील तिरोडा येथील 660 मेगावॅटचा थर्मल पावर प्लांट तत्कालीन काँग्रेस सरकारने अदानीला का दिला? अशा प्रकारे भाजपने अनेक प्रश्न वडेट्टीवारांना केले आहेत.

BJP, Vijay Wadettiwar,Gautam Adani
Video Vijay Wadettiwar: ज्ञानोबा हरी, 'तुकाराम' घरी; अदानींमुळे मुंढेंची बदली? विधिमंडळात विरोधक आक्रमक

याशिवाय, 'अदानी समूहाला 2014 पूर्वी काँग्रेस(Congress) सरकार कडून कोणकोणते पुरस्कार दिले आहेत हे जनतेला कळलं पाहिजे. काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने आदणीला समुहाला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. 2010-11 साठी मनमोहनसिंग सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्प - युनिट-1 त्वरित पूर्ण केल्याबद्दल गोल्ड शील्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2013, ऊर्जा मंत्रालय, मनमोहनसिंग सरकार कडून देण्यात आला.' असंही भाजपने सांगितलं.

याचबरोबर '2013 मध्ये याच काँग्रेसच्या कर्नाटकमधील सिद्धरमैय्या सरकारने सर्वश्रेष्ठ सुरक्षित पॉवर बॉयलर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार याच काँग्रेसने अदानी समूहाला दिलेले आहेत. अदानी तुमचा अदानीला मोठं काँग्रेसने केलं, विश्वासहार्यता चांगली दाखवण्यासाठी अनेक पुरस्कार देऊन गौरव केला. आज ती काँग्रेस भाजपला(BJP) कोणत्या तोंडाने प्रश्न विचारते?' अशा शब्दांत भाजपने वडेट्टीवारांवर पलटवार केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com