Girish Mahajan Politics : गिरीश महाजन यांच्यापुढे नेते हतबल, सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश वाजत गाजत होणार

Sudhakar Badgujar's BJP Entry : भारतीय जनता पक्ष बडतर्फ सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासाठी अतुर असल्याचे दिसत आहे. यासाठी बडगुजर यांनी लावलेली फिल्डिंग आणि गिरीश महाजन यांचा प्लॅन यशस्वी झाल्याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.
Sudhakar Badgujar BJP leader Ravindra Chavan
Sudhakar Badgujar BJP leader Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Badgujar News : शिवसेनेचे बडतर्फ आणि वादग्रस्त उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता वरिष्ठ नेत्यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. भाजप नेत्यांनी बडगुजर यांना पायघड्या अंथरण्याचा निर्णय पक्का केला आहे. येत्या आठवड्यात बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार आहे. तसे संकेतच पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही दिले आहेत. (BJP leader Ravindra Chavan hints at Sudhakar Badgujar's entry)

पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपनेते सुधाकर बडगुजर यांना बडतर्फ केले होते. या बडतर्फ नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी सर्व वरिष्ठ नेते अतुर असल्याचेच आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात बडगुजर हे भाजपचा झेंडा हाती घेण्याची दाट शक्यता आहे.

सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता यांच्या समवेत नृत्य व पार्टी करताना चे फोटो भाजप नेते निलेश राणे यांनी विधानसभेत झळकवले होते. माहिती अधिकार कार्यकर्ता पाटील याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाने बडगुजर यांना टार्गेट करून सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.

Sudhakar Badgujar BJP leader Ravindra Chavan
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांची बडगुजर प्रकरणावरून भाजप नेत्यांना थेट तंबी, म्हणाले, गप्प रहा!

याच बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षा प्रवेश करण्याचा मनोदय जाहीर केला होता. त्यांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची संपर्क केला होता. याचीच कुणकूण लागल्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार सीमा हिरेंसह सिडको भागातील 14 माजी नगरसेवकांनी त्याला तीव्र विरोध केला होता. पक्षाच्या स्थानिक शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठत या प्रवेशाला तीव्र विरोध देखील केला होता.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या कार्यकर्त्यांनी बडगुजर यांना प्रवेश देऊ नये. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र या सर्व आरोपांकडे कानाडोळा करत भाजपच्या नेत्यांनी बडगुजर यांना फक्त प्रवेशच नव्हे तर उमेदवारी देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजप येत्या महानगरपालिका निवडणुकीत काय धोरण ठेवणार आहे हे स्पष्ट झाले आहे

भाजपची नाशिकची जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. गिरीश महाजन यांनी भाजपच्या सर्व नेत्यांना दम देत गप्प राहण्याचा सल्ला दिला होता. आता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बडगुजर यांना प्रवेश दिला जाईल. निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी असे प्रवेश आवश्यक असतात. एक नेत्यांनी यावर मतप्रदर्शन करू नये असा कडक इशारा जळगाव येथे झालेल्या बैठकीत दिला.

Sudhakar Badgujar BJP leader Ravindra Chavan
Girish Mahajan Politics: सुधाकर बडगुजर यांच्यावरील प्रेमापोटी संकटमोचक गिरीश महाजन ठरले व्हिलन?

यानंतर आता बडगुजर यांच्याबाबतीत गिरीश महाजन यांचा प्लॅन यशस्वी झाला आहे. पक्षाच्या सर्व स्थानिक नेत्यांना बाजूला सारत सुधाकर बडगुजर यांचा पुढील आठवड्यात वाजत गाजत भाजप प्रवेश होणार आहे. लवकरच सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोही आणि गुन्हेगारीचे आरोप करणारे नेते त्यांची बाजू घेऊन किल्ला लढवताना दिसतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com