Maharashtra Politics Live Updates : भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Live Updates
Maharashtra Live Updatessarkarnama

Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मभूषण जाहीर करण्यात आले आहे. कोश्यारी हे २०१९ ते २०२३ च्या दरम्यान राज्यपाल होते. कोश्यारी यांची अनेक विधाने आणि निर्णय त्यावेळी वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोश्यारी यांच्यातही जोरदार वाद झाला होता.

Dharashiv : भाजप आमदाराच्या मुलाने वाटले शिवसेनेचे एबी फार्म; संतप्त शिवसैनिकांचा राजन साळवींना घेराव

धाराशिवमध्ये भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या हस्ते शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फार्म वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांना आज संपर्कप्रमुख राजन साळवी यांना घेराव घातल्याचे पुढे आले आहे. साळवी यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यासोबत गुप्त बैठका केल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून माझ्या सहमतीने राजन साळवी यांनी केले आहे. साळवी यांच्या कोणी आरोप करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Pune BJP : पुण्यात भाजपच्या दोन नगरसेविकांच्या समर्थकांमध्ये बॅनरवरून हाणामारी

पुण्यात भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये बॅनरवरून वाद पेटला आहे. दोन गटांत हाणामारी झाली असून यात नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या भावाला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा आरोप नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांच्यावर करण्यात आलेला आहे. मात्र हा प्रकार गैरसमजातून झाला आहे, अशी प्रतिक्रिया तुषार पाटील यांनी दिली आहे.

Nanded : मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री पवार यांची नांदेडमधील कार्यक्रमाला हजेरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी नांदेडमधील हिंद दी चादर या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

Varun Sardesai : एकनाथ शिंदेंसोबत जाण्याआधी मनसेने आमच्याशी चर्चा करायला हवी होती : वरुण सरदेसाई

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवली, त्यामुळे मनसेची ही नैतिक जबाबदारी होती, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याआधी आमच्यासोबत किमान चर्चा तरी करायला हवी होती. पण मनसे हा पक्ष वेगळा आहे, त्यांनी तो निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मात्र विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

Padma Award 2026 : महाराष्ट्रातील 4 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 4 जणांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव होणार आहे. लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड, वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका आणि आर्मिंदा फर्नांडीस यांना हा सन्मान मिळाला आहे.

Kolhapur ZP Election : कोल्हापुरात मतदारांना आमिष देण्याचा प्रकार उघड ! साड्यांचा टेम्पो पकडला; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त !

कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांनी भरलेल्या टेम्पोवर भरारी पथकानं धाड टाकली. साड्यांच्या पिशव्यांमध्ये थेट स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. निवडणूक आचारसंहितेच्या भंगामुळे संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता असून, जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे.

Pune News : पुण्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी ! फ्लेक्स लावण्यावरून लोखंडी पाईप-बांबूने मारहाण

पुण्यातील काशेवाडी परिसरात भाजपच्या दोन नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील नगरसेविका मृणाल कांबळे आणि अर्चना पाटील यांच्या समर्थकांमध्ये फ्लेक्स आणि बॅनर लावण्यावरून वाद उफाळून आला. गणेश जयंतीनिमित्त बॅनर लावताना वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच हिंसक बनला. या झटापटीत लोखंडी पाईप आणि बांबूचा वापर करण्यात आला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज ठाकरे भाकरी फिरवणार

पुणे महापालिकेत मनसेला एकही जागा मिळाली नाही. याची गंभीर दखल राज ठाकरेंनी घेतली असून पुणे मनसे संघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडल पवन कल्याण यांचे नांदेडमध्ये

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडल पवन कल्याण यांचे आज २५ जानेवारी रोजी नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री श्री.कल्याण यांचे स्वागत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. उपमुख्यमंत्री श्री.कल्याण हे विमानतळ येथून शासकीय वाहनाने गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित " हिंद दी चादर " श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विमानतळ येथून रवाना झाले.

भरणे-पाटील मैत्री बहरली

इंदापूरमध्ये आज आयोजित इंद्रेश्वर मॅरेथॉनला राजकीय रंगत चढली. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संयुक्त उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिवसेंदिवस भरणे व पाटील यांची बहरणारी मैत्री राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता एकत्र आले असून, त्यांनी मॅरेथॉनमध्ये झुंबा डान्स करत आणि ३ किमी धाव घेत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची निवड झाली. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या शनिवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत ही निवड एकमताने झाली. महापालिकेवर शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे.

Gulabrao Patil : इम्तियाज जलील यांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा सल्ला

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'AIMIM'चे इम्तियाज जलील यांच्या 'हिरवा महाराष्ट्र' विधानावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, "कोण कोणाच्या म्हटल्याने 'महाराष्ट्र हिरवागार' आणि 'पिवळागार' होत नसतो. अशा वक्तव्याला अर्थ नाही. इम्तियाज जलील यांना माझा सल्ला आहे, अशा प्रकारे वक्तव्य त्यांनी करू नये? आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडू नये."

Akola Update : अकोला इथले 18 पर्यटक श्रीनगरमध्ये हिमवृष्टीमुळे अडकले

अकोल्यातले 18 पर्यटकांचा फिरायला गेलेला ग्रुप श्रीनगरमध्ये हिमवृष्टीमुळे अडकल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर, श्रीनगर आणि पहलगाम इथं फिरण्यासाठी गेलेला हा पर्यटकांचा ग्रुप झालेल्या हिमवृष्टीमुळे अडकला होता. तिकडं हिमवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. इथल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फ साचल्याने रस्ता वाहतूक ठप्प झाली होती. त्यात हा पर्यटकांचा ग्रुप अडकला होता. हिमवृष्टी काहीसी कमी झाल्यानंतर हे सर्व पर्यटक आता रेल्वे मार्गाने परतीच्या प्रवासाला रवाना झाले आहेत. मात्र, या पर्यटकांचे वाहने आणि वाहन चालक अजूनही रस्त्यावर अडकलेले आहेत.

Crime Update : नालासोपाऱ्यात आईकडून 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

नालासोपाराच्या संतोषभुवन इथल्या विद्या विकास मंडळ चाळ परिसरात राहणाऱ्या आईनेच आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना घडला आहे. अंबिका प्रजापती, असे मृत मुलीचे नाव आहे. आरोपी आई कुमकुम प्रजापती हिने आपल्या पोटच्या मुलीचा गळा चिरून तसेच सिलबट्ट्याने मारहाण करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

Maval Update : श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबाच्या मंदिराला दोन कोटींची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देणगी

श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहत असून काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. या मंदिरला एकूण नऊ दरवाजे व सात खिडक्यांवरील खर्चासाठी दोन कोटींची देणगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्याकडे लवकरात लवकर सुपूर्द करणार आहे, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भंडारा डोंगर इथं केली.

Dharashiv ZP Politics : सावंत काका-पुतण्यात जुंपली, काकांना दिला निर्वाणीचा इशारा

एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांना पुतणे धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत, असं म्हणत पुतणे धनंजय सावंत यांनी काका आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला. बोलायला भरपूर आहे, पण मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतो, नाहीतर मी ही हरिश्चंद्र राजा नाही, असं स्पष्ट आणि आक्रमक वक्तव्य धनंजय सावंत यांनी केलं.

Amravati Police : पोलिसांना हेल्मेट वापरण्याची सक्ती, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार

अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात वाढते अपघात लक्षात घेता, त्यावर अंकुश ठेवणे, अपघात झाल्यास त्यातून बचाव व्हावा, या दृष्टीने पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली असून, जे पोलिस कर्मचारी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट वापरणार नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असा आदेश अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जारी केला आहे.

Eknath Shinde Politics : शिवसेनेत तिकीट वाटपावरून गोंधळ; राजन साळवींची सोशल मीडियावर क्लिप व्हायरल

धाराशिव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जिल्हा परिषद तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ सुरू आहे. आता सोशल मीडियावर युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप केले असून, राजन साळवी यांनी शिवसेनेची तिकीट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्याकडे दिली आहेत व तेच त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत उभा करत असल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर केला आहे.

Sangli Politics : स्वाभिमानीला धक्का! जिल्हाध्यक्षाने सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश निश्चित

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा भाजपमध्ये उद्या पक्षप्रवेश होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश खराडे यांचा भाजप प्रवेश स्वाभिमानीसाठी धक्कादायक मानला जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये उद्या सायंकाळी सात वाजता पक्षप्रवेश होईल.

Chandrapur Politics : चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली

चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमच्यासोबत सध्या 31 नगरसेवक आहेत. शिवसेना ठाकरे सेनेची आणि वंचित, हे आमचे नैसर्गिक मित्रपक्ष आहेत. त्यांच्यासोबत माझी बोलणी सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी ते आमच्यासोबत येतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.

Mumbai Update : मुंबई-पुणे 'एक्सप्रेस-वे'वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

विक एंड, प्रजासत्ताक दिन मुळे तीन दिवस सुट्ट्या, आल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आङेत. आज दुसऱ्या दिवशीही मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनामुळे खालापूर तालुक्यातील पालीफाटा इथल्या खोपोली हद्दीतील अमृतांजन पुलापर्यंत 7-8 किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे.

Nanded Politics : एकनाथ शिंदेंचा चव्हाण यांना फोन अन् शिवसेनेचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा

नांदेडच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणुकीत एक दुसऱ्याच्या विरोधात निवडणूक लढणारे भाजप आणि एकनाथ शिवसेना निवडणुकीनंतर एकत्र आले आहेत. येवढचं नाही, तर शिवसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. विशेष म्हणजे युती संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

ShivsenaUBT : चंद्रपूर इथले नगरसेवक ठाकरे अन् आंबेडकरांची भेट घेणार

चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट आला आहे. निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने वंचितसोबत युती करीत एकूण आठ नगरसेवक निवडून आणले. यात वंचितचे दोन तर सेनेचे सहा नगरसेवक आहेत. या आठ जणांच्या अधिकृत गटाने काँग्रेसचे दोन बंडखोर नगरसेवक गळाला लावले असून, हे सर्व दहा नगरसेवक अकोला इथं प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले असून, तिथून ते मुंबईला उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे. शिवसेना इथं महापौर पदासाठी अडून बसली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची गोची झाली आहे.

जळगाव महापौर पदावरून नवा पेच

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी कोणाला संधी देणार हा निर्णय इथे दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेली नेत्यांची कोअर कमिटी हा निर्णय घेईल. येत्या दोन दिवसात महापौर पदाचे नाव निश्चित होण्याचे चिन्ह आहेत. कुठल्या समाजाला महापौर पद द्यायचे यावरून पेच तयार झाल्याची चर्चा आहे.

अधिकाऱ्याला शिवीगाळ, भाजपच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष, माजी आमदार गजानन घुगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. महसूल कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. महसूल कर्मचारी रवी गुट्टे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com