
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ''हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही की, मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत. आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?'' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना @BJP4Mumbai @AmeetSatam @ShelarAshish भाजपाच्या महाभागांना ह्याचंही भान नाही कि मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व देशाला संविधान देणाऱ्या महामानव… pic.twitter.com/tYGnHkAqUM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 5, 2026
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात पिंपरीची अवस्था काय करून ठेवलीय हे जनतेसमोर आहे. पिंपरीतील भाजपचे स्थानिक नेते 40 हजार कोटींचा विकास केल्याचं सांगत आहेत, पण ती कामं कुठे केली? तो पैसा कुठे गेला? याचा जाब विचारायला नको का? असा सवालही त्यांनी केला. तसेच त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते इतर कामात व्यस्त असतील, पण मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असणार आहे असंही अजित पवारांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक युतीत लढायची होती. यासाठी मी भाजप नेत्यांच्या संपर्कात होतो. कदाचित युती होऊ नये असं वाटत असल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढ्याचा निर्णय घेतला. टीका करण्यासाठी नाही मात्र शिवसेना काय करू शकते? हे सांगण्यासाठी मी आलो आहे, असं शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
अरविंद सावंत, खासदार ठाकरेंची शिवसेना
15 आमदार आणि मंत्र्यामध्ये एक मंत्री नाशिकला पालक मिळू शकत नाही
नाशिकच्या कुंभमेळ्याला गुंड माणूस मिळतो, जामनेर मधून इम्पोर्ट करावा लागला
हा नाशिककरांचा अवमान आहे
कुंभमेळा नाशिकमधे होत असताना नाशिकच्याच माणसानं त्याचे नेतृत्व करायला पाहिजे
11 जानेवारीला दादरच्या शिवतीर्थावर ठाकरे बंधुंची सभा होणार आहे. या सभेचे निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःहून शाखांना भेटी देऊन देत आहेत. मनसेच्या शाखांना आज दोन्ही ठाकरे बंधुंनी भेटी दिल्या. यावेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केलं की, माझी आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा शिवतीर्थावर होणार आहे. मोठ्या संख्येने तुम्ही आलं पाहिजेत.
राज्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. शनीशिंगणापूर रोडवर दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अहमदनगर तालुक्यातील उंबरे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघात इतका तीव्र होता की परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक मदतीसाठी धाव घेताना दिसून आले. प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.
परभणी शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पारभणीमध्ये आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक राजकीय परिस्थिती, संघटनात्मक तयारी आणि आगामी निवडणुकीतील रणनीती याबाबत आढावा घेतला. परभणीतील सध्याची राजकीय घडी समजून घेणे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
बीडमधील अंकुश नगरमध्ये दुपारी अचानक नाल्याचे काम चालू असताना कामगारावर बंदुकीने दोन राउंड फायर करण्यात आले. त्या गोळ्या न पिडीत व्यक्तीला न लागल्याने आरोपीने त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने वार केले. या हल्यात हर्षद उर्फ दादा शिंदे यांची हत्या झाली आहे.
48 तासात ZPच्या निवडणुका लागण्याची शक्यता पहील्या टप्प्यात 13 जिल्हा परिषदाच्या निवडणुका होणार. 50 टक्केच्या आरक्षणचा वाद असल्यामुळे पहिल्या टप्प्याच्या आधी 13 जिल्हापरिषदाच्या निवडणुका होणार.
मी आयुष्यात कधीही पदाची लालसा केली नाही आणि मला पदाची चिंताही नाही, असे सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलं आहे. राममंदिर कारसेवेत आपला खारीचा वाटा असल्याचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. ते चंद्रपुरात बोलत होते.
अविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपांची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीतील प्रकाराबाबत निवडणूक निरीक्षकांकडून तसेच पालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. दम्यान 24 तासांत RO वृषाली पाटील यांच्यावर कारवाई होईल, असे आश्वासन देण्यात आले असून पालिका आयुक्तांनीही योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.
नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिक येथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानुसार (PTI) मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
मनसे नेते संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मीडियाशी बोलताना धुरी यांनी राज ठाकरेंनी आपला पक्ष सरेंडर केल्याची टीका केली. तहात साहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले. संदीप देशपांडे आणि आपल्याला उमेदवारी मिळू नये, असा वांद्रेतून निरोप होता, असा आरोपही धुरी यांनी केला.
मुंबईत राज ठाकरे यांना धक्का बसला आहे. मनसे नेते माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. रात्री पैसा वाटता यावा म्हणून 10 वाजेपर्यंत प्रचाराला मुदत दिल्याचा आरोप सपकाळ यांनी आयोगावर केला आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी रात्री दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थंडी आणि प्रदुषणामुळे त्यांना त्रास झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
Congress parliamentary party chairperson Sonia Gandhi was admitted to Sir Ganga Ram Hospital at around 10:00 pm yesterday. She was experiencing respiratory discomfort, and upon medical examination, it was found that her bronchial asthma had been mildly exacerbated due to the… pic.twitter.com/w6LD0jeB74
— ANI (@ANI) January 6, 2026
अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत राजकारणाचा चिखल झाल्याची टीका शिवसेना शिंदेसेनेचे नेते अभिजित आडसुळ यांनी केली आहे. 'अमरावती महापालिकेत महायुतीच्या चर्चेला आम्हाला आमंत्रण होतं, काही कारणामुळे आमची युती झाली नाही, ज्या दोन पक्षाची युती झाली, त्यांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले. बर झालं, आम्ही त्या चिखलातून बाहेर पडलो,' अशी टीका अभिजीत अडसूळ यांनी भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानवर केली.
विलासराव देशमुख यांचे पुत्र सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी, त्यांच्या सोशल माध्यमावर एक पोस्ट अपलोड केली आहे, "दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेले असतात. लिहिलेले पुसता येतं, पण कोरलेलं नाही," अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. रितेश यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूर इथं भाजप कार्यकर्ता मेळाव्यात, कार्यकर्त्याचा जोश पाहून शंभर टक्के लातूर शहरातून विलासरावांचे विचार पुसले जातील, असं विधान केलं होतं, त्यानंतर राजकीय वाद उफाळला आहे.
'सत्ता तुझी असली, तर सत्ता माझीही आहे. मुख्यमंत्री तुझा असला, तर उपमुख्यमंत्री माझाही आहे. त्यामुळे अंगावर यायचं काम करू नका, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, कुणाचीही डाळ शिजू देणार नाही', अशा शब्दात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचं नाव न घेता सुनावलं आहे.
समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने पेट घेतला. चालकाच्या सावधतेने बस थांबविण्यात आली व आरडा ओरड करीत, बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. ही खासगी बस नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती या आगीत संपूर्ण बस खाक झाली आहे. हा अपघात मेहेकर तालुक्यातील शिवणीपिसा गावाजवळ झाला.
नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहरातील उर्दु, मराठी शाळां मधील विद्यार्थ्यांनी आज सकाळी मानवी साखळी तयार करत मतदार राजा जागा हो, एकच लक्ष मताचा हक्क, अशा अनेक घोषणा देत मतदान जनजागृती करत रॅली काढली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये झालेल्या रोड-शोवर बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केला. 'मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड-शोला प्रतिसाद देणारे लोक दिसलेच नाही. त्या रोड-शोमध्ये पुढे पोलिस धावत होते, मधात मुख्यमंत्री आणि मागे कार्यकर्ते धावत होते. हा रोड शो होता? की भाजप कार्यकर्त्यांची व पोलिसांची शर्यत होती हे समजलं नाही. मुख्यमंत्र्यांना अशा गोष्टी शोभत नाही. मुख्यमंत्री पोलिसांची परीक्षा घ्यायला लागले,' असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना अर्ज दाखल करू देण्यासाठी दबाव टाकला असा आरोप करत माजी खासदार हरिभाऊ राठोड उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. 12 उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी आपण लढणार असे म्हणत त्यांनी नार्वेकरांविरोधात एल्गार पुकारला आहे.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.६) जळगावात येत आहेत. जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवर दुपारी तीन वाजता त्यांचा ‘रोड शो’ होणार असून यात महायुतीचे नेते सहभागी होणार आहेत. जळगाव महापालिकेसाठी भाजप- शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महायुती झाली आहे. नेहरु चौक, महात्मा गांधी मार्गावरुन टॉवर चौक- चित्रा चौक- इच्छापूर्ती गणेश मंदिरमार्गे रॅली निघून या रॅलीचा शिवतीर्थ मैदानावर समारोप होईल.
अकोला येथील सभेत गोंधळ झाल्यानंतर आज एमआयएमची सोलापूरमध्ये सभा पार पडणार आहे. असदुद्दीन ओवैसी हे या सभेसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये एकत्र लढत आहेत. त्यानंतर देखील शिंदे त्यांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आहे.
पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र आज (6 जानेवारी) त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी 2 वाजेपर्यंत पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर संध्याकाळी वैकुंठ स्मशानभुमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.