

Buldhana Nagarpalika Nivdanuk: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पक्षाने राज्यातील पहिली उमेदवार जाहीर केला आहे.
बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मनीषा मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बुलढाण्यातील सर्व नगरपरिषदा ,जिल्हा परिषद जागा आम आदमी पक्ष लढणार असल्याची माहिती ही आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश पाटील यांनी दिली आहे.
निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच बुलढाणा नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पक्षाने उमेदवार दिल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुलढाणा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने या शहरात उच्चशिक्षित नागरिक मतदार असल्याने आम आदमी पक्षाला मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाला आहे.
आपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताच बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आप सर्व जागा लढवणार असल्याने महायुतीसह आघाडीतील इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आप’ स्वतंत्र लढणार असल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगर परिषद व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील ११ नगर परिषदेच्या निवडणूका होणार आहे. बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे. खामगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, त्याचप्रमाणे नांदुरा आणि लोणारमध्ये ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती मधील महिलांसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण आहे.
मलकापूर मध्ये ओबीसी प्रवर्गातील महिलांना आरक्षणामुळे संधी मिळणार आहे.
शेगाव आणि जळगाव जामोद नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी खुले आहे.
शेगाव मधील अनुसूचित जातीच्या महिलांना संधी मिळाली आहे.
सिंदखेडराजा, मेहकर आणि चिखली नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.