Prithviraj Chavan : 'सध्या काही कामच नाही...'; पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर बावनकुळेंचा थेट हल्लाबोल

Prithviraj Chavan controversy News : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो, त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी दिले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.
prithviraj chavan, chnadrashekhar bawnkule
prithviraj chavan, chnadrashekhar bawnkule Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केला आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो, त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी दिले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. या विधानानंतर चव्हाण यांच्यावर भाजप नेत्याकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांनतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

“पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काही काम नाही. मीडियात चर्चेत राहण्यासाठी ते बोलतात. काँग्रेसच्या किती लोकांनी, किती लोकांचा जीव घेतला हे त्यांनी तपासले पाहिजे. गोपीनाथ मुंडे हे आमचे नेते होते. भाजपने नेहमीच सर्वोच्च स्थानावर त्यांचा मान ठेवला आहे. जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतो. अशा घटनांना गालबोट लावणे, त्यावर भाष्य करणे, मृत व्यक्ती जिवंत नसताना त्यांच्याबद्दल मीडियाच्या माध्यमातून अशी भूमिका मांडणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी हे समजून घेतले पाहिजे” असे सडेतोड प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिले.

जयपूरला भाजपाची बैठक होत आहे. त्यामुळे मी आज राजस्थानच्या प्रवासात आहे. राजस्थानमध्ये येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. सहप्रभारी राजस्थान म्हणून माझ्यावर काय जबाबदारी आहे, हे आज मला कळणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे माध्यमाशी बोलताना म्हणाले.

prithviraj chavan, chnadrashekhar bawnkule
Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक त्रुटींचा सामना करावा लागतोय. या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वसंतराव पुरके भाजपविरोधात बोलतात म्हणून नाही, तर आदिवासी आश्रम शाळेत मुला-मुलींच्या शौचालयाला दरवाजे नसतील तर ती अवहेलना आहे. पुन्हा तपासणी करु, त्या विभागाचे जे सचिव आहेत, विजय वाघमारे यांच्याशी मी बोलणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com