Prashant Koratkar Issue : कोरटकरवर हल्ला, भुजबळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'वकीलांनाही भावना...'

Chhagan Bhujbal on Prashant Koratkar attack : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमान कारक भाषा वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला. त्यावर भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Chhagan Bhujbal on Prashant Koratkar attack
Chhagan Bhujbal on Prashant Koratkar attacksarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरली. त्यामुळे प्रशांत कोरटकर वादात सापडला आहे. त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर वकीलाने आपला राग व्यक्त केला. यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विरोधात कोल्हापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. न्यायालयाच्या आवारात कोरटकर याच्यावर दोन वेळा आल्याचा प्रयत्न झाला. या विषयावर सबंध महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले या विषयावर जनतेच्या भावना तीव्र आहेत. वकील हे सुद्धा माणूसच असतात. त्यांनाही भावना असतात. कोल्हापूर येथे अशाच प्रकारे वकिलांनी आपले भावना व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमान कारक भाषा वापरणे दुर्दैव आहे, असे प्रकार व्हायला नकोत, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केलीय.

Chhagan Bhujbal on Prashant Koratkar attack
Prashant Koratkar : कोरटकरला बुकी चालक चौधरीची मदत, 30 मार्चपर्यंत पुन्हा कोठडी, वाहनेही जप्त होणार

मात्र अलीकडच्या काळात अशा घटना घडल्या आहेत. त्याचा जनतेत अतिशय वाईट संदेश गेला आहे. त्यावर लोकांच्या भावना तीव्र आहेत. विधिमंडळ अधिवेशनात देखील या विषयावर चर्चा झाली. विविध सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही सदस्यांनी तर अतिशय तीव्र स्वरूपात या प्रकाराचा निषेध केला आहे. विधिमंडळात या विषयावर सत्ताधाऱ्यांनी विरोधक दोघांच्याही भावना देखील तीव्रच होत्या. शासन आणि त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अगदी तसेच घडले असावे

वकील असणे, राग येणे हे सर्व स्वाभाविक आहे. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यात आला त्यामुळे व्यतित होऊन वकिलाने न्यायालयात कोरटकर याच्यावर हात उचलला. असे प्रकार अनेकदा झाले आहेत, एखादा आरोपी पकडल्यानंतर वकील त्याचा खटला चालवायचा की नाही हा निर्णय देखील घेत असतात. हे सर्व निर्णय भावनिक असतात, असेही भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal on Prashant Koratkar attack
Prashant Koratkar : कोल्हापूर पोलिसांपुढे कोरटकर नरमला, आपणच फोन केल्याची दिली कबुली

राज्यात दंगे फसाद होत राहिल्यास राज्यातील उद्योग बाहेर जातील. याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगलीच असावी. तरच समाजात शांतता प्रस्थापित होईल. मात्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जर कोणी केला तर, अस्वस्थता निर्माण होईलच, असेही भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com