.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : नाशिक महापालिकेला कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या संस्थेला अधिकाऱ्यांचा पाठिंबा आणि संरक्षण कसे मिळते? याची चर्चा आज विधानसभेत झाली. आमदार राहुल ढिकले यांनी या संस्थेच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवला. नाशिक महापालिकेला दिग्विजय इंटरप्राईजेस ही संस्था कंत्राटी कामगार पुरवते. या संस्थेच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहे. या संस्थेच्या गैरकारभाराबाबत आज भाजपाचे आमदार राहुल ढिकले यांनी थेट विधानसभेत चर्चा घडवली.
प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत आमदार राहुल ढिकले यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. संबंधित संस्थेने महापालिकेला कामगार पुरवठा करताना सात ते आठ वर्ष या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरला नाही. महापालिकेकडून सर्व निधी मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर या संस्थेने केल्याचे उघड झाले आहे. नियमांचा भंग झाल्याचे उघड झाल्यावर हे संबंधित संस्थेवर कोणती कारवाई झाली नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
सात ते आठ वर्ष कामगारांचा भविष्य निर्वाह निधी या संस्थेने जमा केला नाही. महापालिका प्रशासनाच्या हे गैरप्रकार लक्षात आल्यावर त्यांनी संबंधितांना नोटीस दिली. त्यानंतर हा निधी भविष्य निर्वाह निधीला जमा करण्यात आला. मात्र संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी त्यांना छुपा पाठिंबा देत सेवा सुरळीत ठेवली आहे.
या संदर्भात महापालिकेकडून संबंधित संस्थेने गैरप्रकार केल्याने आणि आर्थिक अनियमितता असल्याने काळ्या यादीत टाकणे आवश्यक होते. मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे या संस्थेला पाठबळ असल्याने कोणतेही कारवाई झाली नसल्याची तक्रार एवढी करण्यात आली. राज्य शासन याबाबत संबंधितांना काळ्या यादीत टाकणार की नाही? असा प्रश्न आमदार ढिकले यांनी केला.
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सात-आठ वर्ष अशाप्रकारे गैरप्रकार होत असेल तर तो गंभीर आहे. त्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात येईल. महापालिकेचे कोणी अधिकारी त्यांना पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरावर केली.
दिग्विजय एंटरप्राइजेस या संस्थेने सात ते आठ वर्ष सातत्याने महापालिकेला कंत्राटी कामगार पुरविले आहेत. या संस्थेला नाशिकच्याच एका मंत्राचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा तर केली, प्रत्यक्षात कारवाई होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.