राठोडांची लफंगाई, राऊतांची कोल्हेकुई..म्हणत चित्रा वाघांनी डिवचले

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरही चित्रा वाघांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
Chitra wagh
Chitra wagh

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या (mahavikas Aghadi) सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. या द्विवर्षपूर्तीनिमित्त भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chiytra wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन कवितेच्या माध्यमातून त्यांनी आघाडी सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांवर टीका केली आहे.

''2 नंबरी सरकारची 2 वर्ष, देशमुखांना वसूलीची घाई, परबांची मुजोरशाही, मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’, निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई, मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, 2 नंबरी #MVA सरकारची ही काळी कमाई ! '' अशा शब्दांत चित्रा वाघांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आसूड ओढला आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुनही राज्यसरकावर टीका केली आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्यामुळेच राज्यात बलात्काराच्या बलात्कार आणि खूनाच्या घटना होत असून या सर्व घटनांना राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महिलांवरील अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीकाही चित्रा वाघांनी केली.

Chitra wagh
ममता मुंबईत, पण उद्धव ठाकरे भेटणार नाहीत...

आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. पण महिलांच्या संरक्षणासाठी आघाडी सरकारकडून पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाही. कुर्ला येथे एका तरुणीचा बलात्कार करून खून करण्यात आला. साकीनाका परिसरात पथदिवे नसल्याने साकीनाक्यातही बलात्काराची घटना घडली. या सर्व घटना राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या अपयशामुळेच घडल्याचे त्यांनी म्हटले. राज्यसरकारने घोषणा केलेला शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com