ममता मुंबईत, पण उद्धव ठाकरे भेटणार नाहीत...

ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mamata Banerjee mumbai Visit)
Mamata-Uddhav
Mamata-UddhavSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी यांच्या विवाहा सोहळ्यानिमित्तच्या रिसेपशनला उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ममता दीदी उद्या (१ डिसेंबर) दूपारी १ वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटणार आहेत.

मात्र या दौऱ्यात ममता दीदी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेटू होवू शकणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहेत. त्यामुळे विश्रांतीच्या कारणाने या दोन मुख्यमंत्र्यांची भेट होवू शकणार नसल्याचे सांगितले जात आहे. ममता यांनी आपल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

Mamata-Uddhav
शिवसेना कदापी माफी मागणार नाही : चतुर्वेदींचा आक्रमक पवित्रा

ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत म्हत्वपुर्ण मानला जात आहे. आगामी गोवा राज्याची निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळेच राज्यातील नेत्यांच्या भेटीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात वेगळ्या घडामोडी पाहण्यास मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या नुकत्याच दिल्लीच्या दौऱ्यावरुन आल्या आहेत. यात अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट त्यांनी घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.