
Congress MP Varsha Gaikwad : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला लागलं आहे आणि घडामोडींनाही वेग येत आहे. काँग्रेसने आता महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणं सुरू केलं असून, महायुतीचं पापत्रच जाहीर केलं आहे. सरकारी घोषणा आणि त्यातील फोलपणाचा या पापत्रता समावेश करण्यात आला आहे.
तसेच, महायुती सरकार विरोधातील एक रॉक साँगही रिलीज केलं गेलं आहे. सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय ? असे त्या रॅप साँग हे शब्द आहेत. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि खासदार वर्षा गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'शिंदे-फडणवीस-पवार सरकार मुंबईसाठी हानिकारक ठरले आहे. त्यांच्या अन्यायकारक राज्याचे पापपत्र आज आम्ही जनतेसमोर मांडले आहे. मुंबईच्या साधनसंपत्तीची लूट, इथल्या लोकांची फसवणूक, मुंबईच्या जमिनी मित्रांना दान, उद्योग मुंबईबाहेर पळवणे आणि तत्सम लोकविरोधी निर्णयांचा हा अहवाल आहे.
हे आरोपपत्र म्हणजे चार्जशीट आम्ही जनतेच्या न्यायालयात सादर केले आहे. या सरकारला जनतेला उत्तर द्यावे लागेल.' तसेच 'आम्ही आता इलेक्शन मोडवर जात आहोत असं मी जाहीर करते, असंही वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी जाहीर केलं.
याचबरोबर 'एकनाथ शिंदे(Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईची अधोगती करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. वरळीमधील हिट आणि रन ही घटना मर्डर आहे. मुंबईमधील सर्व महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. मुंबईत प्रचंड खड्डे आहे. रस्त्याची कामं मित्रांना दिली जात आहेत. अधिकाऱ्यांचं एक रेट कार्ड आहे, आमदारांच एक रेट कार्ड आहे.' असा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.