Congress candidate : काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर; पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी

Congress List : काँग्रेसची महाराष्ट्रासह सात राज्यातील ५७ जणांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश आहे.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

pune News : लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसची महाराष्ट्रासह सात राज्यातील ५७ जणांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास सात नाव जाहीर करण्यात आले. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, नंदुरबार गोवाल पाडवी, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे अशा महाराष्ट्रातील सात जणांना उमेदवारी देण्यात आली.

त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे. लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे.

MLA Ravindra Dhangekar
Arvind kejriwal Arrest By ED : दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक

राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेसने गुरुवारी रात्री सात उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 उमेदवार जाहीर करण्यात आले होते तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने साजीद खान पठाण उमेदवारी दिली आहे.

पुण्यातून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.

माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अन्य काही जणांनी लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, यामध्ये जोशी आणि धंगेकर यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या दृष्टीने आपला प्रचार सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com