Vidhan Sabha News : विधानसभेत काँग्रेस संतापली; अर्थमंत्र्यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने महाविकास आघाडीचा सभात्याग

Vijay Waddetivar News : अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला. अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेत शुक्रवारी काँग्रेससह महाविकास आघाडी आक्रमक झाली असल्याचे पाहावयास मिळाले. अतिरिक्त अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला. अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

अतिरिक्त अर्थसंकल्पावरील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने शुक्रवारी विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी वडेट्टीवार यांनी सवांद साधला त्यावेळी ते बोलत होते.

विजय वडेट्टीवार (Vijay wadettivar) म्हणाले की, अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ घेतला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या सगळ्या मुद्यांच्या संदर्भात आम्हाला बोलू दिले नाही. अर्थसंकल्पात आकडे फुगवून दाखवले आणि प्रत्यक्ष खर्च कमी दाखवला आहे, असा आरोप त्यांनी केला.

कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या २०२३-२४ मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ ४७ टक्के झालेला आहे. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणावर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि BDS वर दिलेला विनियोजन खर्च यात मोठी तफावत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar
Nilesh Lanke : खासदार लंकेंनी घातली गळ्यात कांद्याची माळ; जिल्हाधिकाऱ्यांना दिली खास भेट

सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचे पाप या सरकारकडून होत आहे. या सरकारमध्ये जाणारे आरएसएसच्या संस्कृतीला, मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेत आहेत. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर एक रुपया खर्च झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

वडेट्टीवार यांनी लगावला टोला

बोलाचा भात अन बोलाची कढी केवळ वाढवून दाढी राज्यकारभार करता येत नाही, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. जवळपास मुंबईतील १३ मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा घाट घातला. त्यातील पाच प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. त्याचा शासननिर्णय काढला आहे. अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रकल्पातून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतला आहे. अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
MLA Rahul Dhikale : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी राहुल ढिकलेंचे आता मुख्यमंत्र्यांना साकडे !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com