मल्ल्या, परमबीर सिंह पळून जातात, तेव्हा चौकीदार सरकार झोपलं असतं का?

चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते? हे झोपेचे सोंग उघड होऊन जनतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही, असे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी स्पष्ट केलं.
Parambir Singh, Narendra Modi, Sachin Sawant
Parambir Singh, Narendra Modi, Sachin Sawantsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) हे रशियात पळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्याशिवाय राज्य सरकारनेही परमबीर सिंह याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हे सारे सुरू असतानाच सिंह हे भारतातून पळून गेल्याचे समजते. यावरुन कॉग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

Parambir Singh, Narendra Modi, Sachin Sawant
मुख्यमंत्र्यांना भाजपचं सडेतोड पत्र ; मराठी अस्मिता कुठे?

सचिन सावंतानी टि्वट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की देश सोडून पळून जातात तेव्हा चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते? हे झोपेचे सोंग उघड होऊन जनतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही.

''जर परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले हे सत्य असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपाची निश्चित भूमिका असणार आहे. परमबीर सिंहना वाचवणे #bjp साठीच गरजेचे आहे. सर्वाआधी #NIA ने #Antilia प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. NIA च्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की वाझे परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होता व परमबीर यांनी जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेवर अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी ढकलण्यासाठी सायबर तज्ज्ञाला 5 लाख रुपये दिले. तरीही परमबीर सिंह पळून गेले तर ते NIA चे अपयश आहे. चौकीदार सरकार काय करत होते? नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या आणि परमबीर सारखे लोक जेव्हा देश सोडून पळून जातात तेव्हा चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते? हे झोपेचे सोंग उघड होऊन जनतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केलं.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले आहे की, परमबीर सिंह रशियाला पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय ते जाऊ शकत नाहीत. त्यांना परवानगी कुणी आणि कशी दिली हे तपासले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांना शोधून काढू, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

''महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत आहे. त्यांच्यावर डिपार्टमेंटकडून कारवाई केली जाणार आहे. अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर त्यांच्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं सरकारला परमबीर सिंग यांच्याकडून हवी आहेत. सरकार नियमांनुसार जी कारवाई आहे ती करतं आहे,'' असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

परमबीर सिंह यांनी आपल्याला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्याचं कारण देऊन रजा घेतली. मे ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी आधीची रजा वाढवून घेतली. माझी शस्त्रक्रिया झाली असून मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही परमबीर सिंग यांनी आपली प्रकृती अद्याप ठीक झाली नसल्याचं सांगितलं आणि रजा वाढवून घेतली. परमबीर सिंग यांना 29 ऑगस्टला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं मात्र तेव्हापासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com