'भाजपचा हा माज जनतेनेच उतरवला पाहिजे'

आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी कोठडीत व चिरडणारे भाजपा नेते मोकळे
sachin Sawant
sachin Sawant Sarkarnama

उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) लखीमपूर खीरी हिंसाचाराचे (Lakhimpur Khiri Voilence) देशभर पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला जात असताना त्यांना युपी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत गेलेल्या काही कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यसरकार व केंद्रातील मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. लखीमपूर हिंंसाचार आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या विरोधात आता महाराष्ट्रातील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.

sachin Sawant
ही महागाई नव्हे, तर मोदी सरकारची लूटमार आहे...

“भाजपाने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. माणसेच चिरडत आहेत. हा माज जनतेनेच उतरविला पाहिजे. आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी कोठडीत व चिरडणारे भाजपा नेते मोकळे आहेत. ४५ लाख देऊन शेतकऱ्यांचा आवाज विकत घेण्याचा प्रयत्न आहे. मोदी गप्प का?” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे विचारलं आहे.

तर दूसरीकडे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून युपी सरकारला इशारा दिला होता. '' कृषी कायद्याविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने आपल्या गाडीखाली चिरडणे हे अत्यंत अमानवी आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेश यापुढे अशा अहंकारी भाजप नेत्यांची जबरदस्ती सहन करणार नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीतून फिरू शकणार नाहीत.'' असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पूर्वनियोजित लखीमपूर खीरी दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्याची माहिती मिळताच आंदोलक शेतकरी त्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणी पोहचले. ३ ऑक्टोंबरला ते रस्ता मार्गे लखीमपूर पोहचले. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com