Mumbai News : काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देशातील जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांच्या या मुद्यामुळे सत्ताधारी भाजप पुरती घायाळ झालीय. या मुद्यावर भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बचावात्मक भूमिका घेत होते.
परंतु संघाने या मुद्यावर आता सकारात्मकता दर्शवली असून, त्यापाठोपाठ रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याच मुद्यावर राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळला आहे. केंद्रीय मंत्री आठवले यांची भूमिका आणि त्याचबरोबर संघाने घेतलेल्या या भूमिकेवर केंद्रातील सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले काल नगर शहरात होते. संविधान सन्मान मेळाव्यात ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशपातळीवर लावून धरलेल्या जातिनिहाय जनगणनाच्या मुद्यावर रामदास आठवले यांना पहिल्यादांचा भाष्य केले. जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.
रामदास आठवले म्हणाले, "जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. एसटी, एनटीचे आरक्षण निश्चित होते. पण ओबीसी आणि खुल्या वर्गाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जनगणना लवकर करणे आवश्यक आहे". देश हिंदू राष्ट्र करण्याचा भाजपचा (BJP) कोणताही विचार नाही. तसेच त्यांच्या विषयपत्रिकेवर नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
RSS ची तीन दिवस राष्ट्रीय समन्वय समिती बैठक झाली. या बैठकीत अनेक राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. यात राहुल गांधी यांनी लावून धरलेल्या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दावर देखील चर्चा झाली. देशातील विशिष्ट जातींची डेटा गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी RSS ने अनुकुलता दर्शवली आहे.
RSS चे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी तशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. परंतु या डेटाचा उपयोग राजकारणासाठी न करता त्या समाजांच्या विकासासाठी केला जावा, अशी अपेक्षा RSS ची आहे, असेही आंबेकर यांनी सांगितले. हिंदू समाजामध्ये जाती आणि जातीय समीकरणे अतिशय नाजूक विषय आहे. मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तो महत्त्वाचाही आहे. त्यामुळेच हा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणाचा आधार होऊ नये, असे आंबेकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.