Nana Patole Vs Praful Patel : हायकमांडनं सांगितल्यास मुख्यमंत्रिपदी मीच...

Nana Patole and Praful Patel are competing for the post of Chief Minister: राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदी कौन यावर जुंपली आहे.
Nana Patole Vs Praful Patel
Nana Patole Vs Praful Patel Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी कधीही अचारसंहिता लागू शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. एकमेकांची उणीधुणी काढून डिवचलं जात आहे. अंदाज घेतला आहे.

यातच मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना डिवचलेलं दिसते. नानांनी देखील पटेल यांना यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Election) जागा वाटपाची चर्चा सुरू आहेत. तत्पूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जुगलबंदी रंगत आहे. मुख्यमंत्रिपदी कोण, अशी चर्चा होत आहे.

प्रमुख पक्षांकडून काही नेत्यांची नावे समोर येत आहे. तशी बॅनरबाजी देखील झळकवली जात आहे. जागा वाटपाची, त्यानंतर निवडणुकांसमोरे जाण्याची चर्चा बाजूला राहिली, अन् मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांमध्ये जुंपताना दिसते आहे.

Nana Patole Vs Praful Patel
Congress Vs BJP News: काँग्रेसच्या 'हाता'चा अनेकांना साक्षात्कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना डिवचलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी नानांचे नाव न घेता, 'ते भावीच राहणार आहे. तसे ते भावीच राहणार, त्यांच्या पुढे काहीच लागणार नाही. भावी-भावीच राहणार आहे.

आयुष्यभर भावी राहतील, हे समजू घ्या', असे म्हणत डिवचलं आहे. यावर नाना पटोले यांना देखील पटेल यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "आता मी मुख्यमंत्री होणार, माझ्या नशिबात काय असेल, हे प्रफुल्ल पटेल काढू शकत नाही. आमचे हायकमांड निर्णय घेतील, त्यानुसार होईल", असा टोला नाना यांनी पटेल यांना लगावला.

Nana Patole Vs Praful Patel
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा नाद करायचा नाय..! दसरा मेळाव्यासाठी तब्बल 900 एकरचं मैदान, 500 क्विंटल बुंदी अन्...

ठाकरेंकडून कोंडी

महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून बरंच खलं सुरू आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस वाढू लागली आहे.

महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला वारंवार सांगितलं आहे की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट करा, त्याला आमचा पाठिंबा असेल. यावर दोन्ही पक्षांनी मौन बाळगलं आहे. परंतु नाव समोर आणून, बॅनरबाजी करत चाचपणी केली जात आहे.

अजितदादांची इच्छा...

महायुतीमध्ये भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा चेहरा फिक्स असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपदावर संधी मिळावी म्हणून नवस केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com