Maharashtra Congress: काँग्रेसचं ठरलं, बंडखोरांना क्षमा नाही..! आबा बागूल, राजेंद्र मुळक यांच्यासह 'या '21 जणांचं निलंबन

Nana Patole news : काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली कारवाई
Nana Patole
Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

Congress action against rebel candidate : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर राजकीय पक्षांकडून निलंबनाची कारवाई सुरू आहे. आता काँग्रेसनेही महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या बंडखोरांवर कारवाई केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभार रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षाकडून या बंडखोरांची नावे आणि मतदारसंघ एका यादीद्वारे जाहीर करण्यात आली आहेत.

निलंबनाची कारवाई झालेल्या बंडखोरांची नावे आणि मतदारसंघ -

1.आरमोरी विधानसभा मतदासंघ - आनंदराव गेडाम, शिलु चिमूरकर 2. गडचिरोली मतदारसंघ - सोनल कोवे, भरय येरमे 3. बल्लारपूर - अभिलाषा गावतूरे, राजू झोडे, 4.भंडारा - प्रेमसागर गणवीर, 5. अर्जुनी मोरगांव - लांजेवार, 6. भिवंडी- विलार रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर, 7. मिरा भाईंदर - हंसकुमार पांडे, 8. कसबा पेठ - कमल व्यवहारे, 9.पलूस कडेगाव- मोहनराव दांडेकरक, 10.अहमदनगर शहर - मंगल विलास भूजबळ, 11.कोपरी पाचपाखाडी - मनोज शिंदे, 12. सुरेश पाटीलखेडे, 13.उमरखेड - विजय खडसे, 14.यवतमाळ - शबीर खान, 15.राजापूर - अविनाश लाड, 16.काटोल - याज्ञवल्य जिचकार, 17.रामेटक - राजेंद्र मुळक

Nana Patole
Congress Politics : बंडोबांचा थंडोबा करण्यास काँग्रेसला 'नो इंटरेस्ट'!

महायुतीला एकीकडे पुणे शहरातील बंडखोरी रोखण्यात यश मिळाले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र बंडोबांना थंड करणार अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कसबा,पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या(Congress) नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Nana Patole
Nana Patole : नाना पटोलेंचा पुन्हा 'लेटरबॉम्ब', DGP संजयकुमार यांच्या नियुक्तीवर आयोगाकडे काय केली मागणी

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक (DGP) संजयकुमार वर्मा यांच्या प्रभारी नियुक्तीबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. "राज्यातील निवडणुकीत काळात पोलिस महासंचालक निःपक्षपद्धतीने काम करण्यासाठी वर्मा यांची नियुक्ती प्रभारी नसून, पूर्ण क्षमतेने असावी. वर्मा यांची नियुक्ती प्रभारी करून घटनात्मक तरतुदीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश आणि प्रशासकीय तत्त्वांचे उल्लंघन आहे", असा पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com