Akshay Shinde Encounter : खासदार गायकवाडांनी थेट विचारलं; 'बदलापूरच्या शाळेचे विश्वस्त आपटे फरार का?'

Congress Varsha Gaikwad surrounded the government asking questions about the absconding trustee of Badlapur school : बदलापूर इथल्या बाललैगिंक अत्याचार झालेल्या शाळेच्या फरार विश्वस्तांवरून सरकारला प्रश्न विचारत कात्रीत पकडलं.
 Varsha Gaikwad
Varsha Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापूर इथल्या बाललैगिंक अत्याचारातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. सत्ताधारी या चकमकीची समर्थनार्थ असतानाच, विरोधांकडून मात्र हा 'न्याय एन्काऊंटर' नसल्याचा आरोप करत आहेत. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करणार आहे. त्यामुळे या एन्काऊंटरचे गांभीर्य वाढलं आहे.

यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेशी निगडीत असलेल्या बदलापूरमधील आपटे शाळेतील विश्वस्तांसंदर्भात प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरलं आहे. या प्रश्नाचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

बदलापूर प्रकरणातील नराधमाचा मृत्यू झाला असला, तरी पीडितांच्या कुटुंबियांना अजून न्याय मिळालेला नाही, असं म्हणत काँग्रेसच्या (Congress) खासदार वर्षा गायकवाड यांनी बदलापूर शाळेचे विश्वस्त आपटे अजूनही फरार का? त्यांना संरक्षण कोण आणि का देत आहे? असा सवाल केला आहे.

 Varsha Gaikwad
Akshay shinde Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राजकारण तापलं; शरद पवार यांचं सूचक ट्विट

खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी लोकांच्या मनातील प्रश्न असल्याचे सांगत गंभीर मुद्यांवर सरकारलं घेरलं आहे. शाळेची व्यक्ती भाजपशी थेट संबंधित असल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याचा दबाव पोलिसांवर टाकला जात आहे का? बदलापूर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायक का झाले? कोणाला पाठिशी घातलं जात आहे? असे प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तर महायुती सरकारकडं मागितली आहेत.

 Varsha Gaikwad
Udayanraje Statement : अक्षय शिंदे 'एन्काऊंटर'वर उदयनराजेंची पहिलीच पण रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले, 'अशांना गोळ्या घालून नाही तर...'

बदलापूर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

पोलिसांनी सुरवातीला गुन्हा नोंदवण्यास उशीर का केला? त्यावेळेस त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मिळत नाहीत, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. गुन्ह्याशी निगडीत असलेल्या सर्वांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. या गुन्ह्याचा निषेध करणाऱ्या नागरिकांवर दाखल केलेले गु्न्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशीही मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.

'सीबीआय'मार्फत चौकशी व्हावी

बदलापूर प्रकरणात आधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याच, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचा गंभीर आरोप झालाय. शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपशी संबंध असून, तो अजूनही फरार आहे. त्याला पोलिस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेला जबाब कसं दुर्लक्षित करता येतील? त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत, त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेंची हत्या करण्यात आलेली नाही ना? असा प्रश्न करत याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com