Mumbai News : महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संप खूपच ताणला होता. हा संप एकप्रकारे भडकवाला होता, त्याची आठवण करून देत काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टायमिंग साधत निशाणा साधला.
"'मविआ'चे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे राजकार भाजपने केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकरण करून संपत भडकवण्याचे काम त्यावेळी केले", असं टायमिंग साधत विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर आरोप केला.
'मविआ'चे सरकार असताना 26 ऑक्टोबरला 2021 एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. हा संप बराच काळ सुरू होता. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार किरीट सोमय्या असे भाजपचे (BJP) नेते सहभागी झाले होते. एकप्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत तत्कालीन 'मविआ' सरकारवर तोफ डागत होते. शिवसेनेचे नेते अनिल परब त्यावेळी परिवहन मंत्री होते. त्यांनी या संपात भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.
'मविआ'चे सरकार कोसळल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेसचे (Congress) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टायमिंग साधत महायुती सरकारवर, विशेष करून भाजप निशाणा साधला आहे. ट्विटवर पोस्ट शेअर करत, हे सरकार काम करते, तर मग एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्याची वेळ आलीच का? या सरकारमध्ये कामे कोणाची होत आहे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
'मविआ'चे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपात भाजपने कसे राजकारण केले, याची आठवण देखील विजय वडेट्टीवार यांनी करून दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात त्यावेळी भाजपने राजकारण केले होते. भाजपच्या नेत्यांनी मुद्दाम राजकरण करून संप भडकवण्याचे काम त्यावेळी केले. आज राज्यात महायुती सरकार आहे. त्यांनी आता कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
गणपती आणि एने सणासुदीच्या काळात एसटीचा संप सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींना आणि आर्थिक खर्चाला समोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी आणि राज्यातील सामान्य प्रवाशी दोघांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तातडीने हा संप सोडवण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.