गुंड पुजारीच्या विरोधात गुन्हा दाखल ; हॉटेल व्यावसायिकाला धमकी

बोरिवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गुंड सुरेश पुजारी (Gagster Suresh Pujari) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gagster Suresh Pujari
Gagster Suresh Pujarisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कुख्यात गुंड सुरेश पुजारी (Gagster Suresh Pujari) यांच्याविरोधात एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बोरिवलीतील एका हॉटेल व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवली परिसरातील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापकाने पुजारीविरोधात तक्रार दिली आहे. हा व्यवस्थापक भाईंदर परिसरात राहतो. त्या हॅाटेलचे चार मालक असून ते संचालकही आहेत. ता. २५ जूनला ते नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये आले होते. दुपारी काही कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन एका व्यक्तीने दूरध्वनी केला.

संबधित व्यक्ती गॅगस्टर सुरेश पुजारी बोलत असल्याचे सांगून धमकी दिली. त्यानंतर २६ ते २९ जून या कालावधीत आलेले दूरध्वनी घेतले नाही. म्हणून त्यांना दुसऱ्या मोबाईलवरुन एक संदेश आला. या संदेशात सुरेश पुजारीने त्यांना शेठने फोन न केल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

याच दरम्यान फिलिपीन्स येथे सुरेश पुजारीला अटक झाल्याचे वृत्त त्यांना समजले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यांत मालकांने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरेश पुजारीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

Gagster Suresh Pujari
अजितदादा, हवेत गोळ्या मारू नका ; खोटारडेपणा थांबवा!

सुरेश पुजारी मागील अडीच ते तीन वर्षांपासून फिलिपाईन्समध्ये सुरेश पै नावाने राहत होता. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन आणि डिपार्टमेंट ऑफ जुरीडिक्शन यांच्या संयुक्त कारवाईत सुरेश पुजारीला फिलिपाईन्समधून अटक करण्यात आली आहे.

सुरेश पुजारी याच्याविरुद्ध ठाणे पोलिस आयुक्तालयाचा हद्दीतील अनेक पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये नुकताच त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. सुरेश पुजारी हा साधा मोबाईल फोन वापरत असून धमक्या देण्यासाठी तो इंटरनेट कॉलवर बोलतो. या इंटरनेट कॉलिंगसाठी त्याने दुसऱ्या देशातील मोबाईल क्रमांक वापरत आहे. इतर बँकेच्या व्यवहारासाठी त्याने एक स्मार्ट फोन ठेवला असून त्या माध्यमातून तो बँकेचे व्यवहार करीत होता, अशी माहिती समोर आली आहे.

सुरेश पुजारी विरुद्ध मुंबईत १८ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २००७ मध्ये सुरेश पुजारी हा भारतातून पळून गेला होता. मुंबई पोलिसांनी सुरेश पुजारी टोळीतील १५ जणांना मागील काही वर्षांत अटक करण्यात आलेली आहे. २०२० मध्ये तो आपल्या एका प्रेयसीसोबत फिलिपाईन्समध्ये लपून बसला असल्याची माहिती मुंबई पोलिसांना यापूर्वी मिळाली होती. सीबीआयने सुरेश पुजारी विरोधात रेड कोर्नर नोटीस देखील काढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com