MNS On Shiv Sena Thackeray Party : मनसेचा शिवसेना ठाकरे पक्षावर 'हिरवा वार'; मतांसाठी 'कुबड्या' घ्यावाच लागणार

MNS Criticizes Shiv Sena Thackeray Party for Being In Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे राहण्याची घोषणा म्हणजे, विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या कुबड्यांची मदत घेणे होय. मनविसे राज्य उपाध्यक्ष नीलेश भोसले यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
MNS On Shiv Sena
MNS On Shiv Sena sarkarnama

MNS On Shiv Sena Thackeray Party News : महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे राज्य उपाध्यक्ष नीलेश भोसले यांनी इतर मतांवरून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचले आहे. विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राची आहे. देशाची नव्हे.

लोकसभेला शिवसेना ठाकरे पक्षाला मुंबईत मराठी माणसांची मतं मिळाली नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत राहून राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसच्या कुबड्यांचा आधार घेत इतर समाजाची मते (हिरवी) मिळवणार असल्याची जहरी टिप्पणी नीलेश भोसले यांनी केली. नीलेश लंके यांनी याबाबत केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली असून व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभेच्या निवडणुकीबाबत त्यांच्या रंगशारदा सभागृहातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात एक निरीक्षण नोंदवले. लोकसभा निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झालेले मतदान हे मराठी माणसांचे नसून मोदीविरोधात झालेले आहे, असे राज ठाकरे यांनी भाषणात म्हटले. राज ठाकरे यांच्या या निरीक्षणाचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने धसका घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होऊन उद्धव ठाकरे यांनी आघाडीतच राहून राज्यात विधानसभा निवडणुका लढवणार आहे, असे म्हटले.

MNS On Shiv Sena
Uddhav Thackeray & Sharad Pawar : 'त्यांच्या'साठी परतीची दारे उघडे आहेत का? ठाकरे, पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला

उद्धव ठाकरे यांची ही घोषणा म्हणजे त्यांना विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या (Congress) कुबड्यांची मदत होय, असे खरमरीत टीका नीलेश भोसले यांनी पोस्टमध्ये केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्षाला देखील कळाले आहे की, विधानसभेच्या निवडणुकीत मोदी विरोधात कितीही बोललो तरीही मराठी माणूस त्यांच्या पक्षाला मतदान करणार नाही.

विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राची आहे. देशाची नव्हे. त्यामुळे इतर समाजाची मते (हिरवी) हवी असतील तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्या कुबड्याचा आधार शिवेसना ठाकरे पक्षाला घ्यावाच लागेल, अशी टिप्पण करत नीलेश भोसले यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला डिवचले आहे.

MNS On Shiv Sena
Video Uddhav Thackeray : मला भाजपसोबत जायचं आहे, पण...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'प्लॅन'

मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. राज्यात मनसे 225 ते 250 जागांवर चाचपणी करत आहे. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी मेळाव्यात विधानसभेच्या कामाला लागा असा आदेश दिला आहे. लोकसभेसाठी मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेला मात्र एकला चलोची भूमिका राहणार असल्याचे दिसते. मनसेने विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढल्या आहेत.

मनसेने निवडणुकीला समोरे जाताना शिवसेनेला टार्गेट करण्याचे निश्चित केल्याचे दिसते. राज ठाकरे यांच्या भाषणातील निरीक्षणाचा आधार घेत मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना ठाकरे पक्षावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. मनसे राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे इच्छुक असलेले पदाधिकारी विधानसभेच्या तयारी गुंतल्याचे दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com