Supriya Sule : सरकारचा वेग 'गोगलगायी' एवढा? कोणत्या उपमुख्यमंत्र्यांची कबुली; सुप्रिया सुळेंनी टायमिंग साधलं

Supriya Sule criticism of the mahayuti BJP government : खोकेबाजीच्या अविद्येमुळे महायुती सरकारने एवढे प्रताप केल्याची टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकाचा वेग 'गोगलगायी'चा असल्याचे सांगताच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर टायमिंग साधलं.

सुप्रिया सुळे यांनी महायुतीमधील भाजपला जिव्हारी लागेल, अशी टोलेबाजी केली. खोकेबाजीच्या अविद्येमुळे मती, नीती, गती कशी गेली, याचा टोला खासदार सुळेंनी फडणवीसांना लगावला आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर करत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः त्यांच्या सरकारचा वेग गोगालगायीचा आहे, असे सांगत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत सुप्रिया सुळे यांनी महायुती भाजप सरकारच्या 'खोकेबाजीच्या अविद्ये'वर ताशोरे ओढलेत.

Supriya Sule
Video BJP Politics : महायुतीचा फाॅर्म्युला ठरला! भाजपला 160 तर अजितदादा, एकनाथ शिंदेंना फक्त 64 जागा?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो, असं कबूल केलं, ते बरं झालं! म्हणजेच महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत, याची जाहीर कबुली त्यांनी दिलीय? असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, याची आठवण करून दिली.

Supriya Sule
NCP Ajit Pawar : 'NCP'मध्ये भूकंपाचे संकेत? पक्ष नेतृत्वाला डावलून अजितदादांच्या 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक

खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाल्याचा खोचक टोला लगावताना, या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले, म्हणजेच वित्त गेले, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महायुती भाजप सरकारच्या गतीमान कारभाराला फटकारलं.

वित्त नसल्याने शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊन शकत नाही. म्हणजेच, महायुती हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा टोला, सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com