Devendra Fadnavis: मनोज जरांगेंच्या निवडणुकीतून माघारीच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis on Manoj Jarange: मनोज जरांगेंचा बोलावती धनी हा महायुतीमधीलच मोठा नेता? जाणून घ्या फडणवीसांनी नेमकं काय दिलं उत्तर
Devendra Fadnavis on Manoj Jarange
Devendra Fadnavis on Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत मूदत असल्याने सकाळपासूनच राजकीय पक्षांच्या नेत्यांची बंडखोरी शमवण्यासाठी मोठी लगबग सुरू होती. अनेक पक्षांना काहीप्रमाणात बंडखोरांना शांत करण्यात यशही आलं. तर काही ठिकाणी अद्यापही बंडखोरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आधी उमेदवार उभा करणार असल्याचं जाहीर केलेलं असताना, आज सकाळी पत्रकारपरिषदेत बोलताना आपण या निवडणुकीत उमेदवार उभा करणार नसल्याचे सांगून सर्वांनाच धक्का दिला. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, शिवाय विविध तर्कवितर्कही लावले जात आहेत.

दरम्यान, साम मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही मनोज जरांगे यांच्या या मोठ्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची अधिकृत घोषणाही केली आहे, याकडे तुम्ही कसं बघता? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'लोकशाही आहे. निवडणूक लढायचं कोणी ठरवू शकतं, न लढायचं कोणी ठरवू शकतं. त्यामुळे या संदर्भात, मी काय फार मत माझं व्यक्त करणार नाही.'

Devendra Fadnavis on Manoj Jarange
Devendra Fadnavis on Elective Merit: ...अन् फडणवीसांनी सांगितलं 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे नेमकं काय असतं?

तसेच, 'त्यांनीच लढायचं ठरवलं होतं. त्यांनीच अनेक नेत्यांशी चर्चा केली. मग मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली, अन्य समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली. मग जागांची घोषणा केली. मग आता मी लढणार नाही म्हणून त्यांनीच घोषित केलं. लोकशाही आहे त्यांचा अधिकार आहे. कुठल्याही घोषणा ते करू शकतात, माझी त्यावर काही प्रतिक्रिया नाही. भविष्यामध्ये मी लक्ष ठेवून आहे, ते कुठली भूमिका घेतात. ती भूमिका आल्यानंतर मग काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर देईन.' असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

Devendra Fadnavis on Manoj Jarange
Devendra Fadnavis : 'माहिमबद्दल एकनाथ शिंदेही राज ठाकरेंच्या बाजुने', देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

याशिवाय, मनोज जरांगेच्या (Manoj Jarnge) पाठिशी महायुतीचा ब्रेन आहे, त्यांना महायुतीमधूनच आर्थिक पाठबळ जातं, जरांगेंचा बोलावती धनी हा महायुतीमधीलच मोठा नेता आहे, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, 'मी तरी हे ऐकलं नाही. या उलट मला हे नेमही ऐकायला मिळायचं की सगळं कनेक्शन महाविकास आघाडीतलं आहे, असं ऐकायला मिळायचं मला. मी त्यावर काही टिप्पणी करत नाही. पण सातत्याने महाविकास आघाडीचे नेते जाऊन भेटायचे, ते भेटल्यानंतर काही गोष्टी घडायच्या. त्यामुळे कनेक्शन कुठे आहे, तर बाबा तिथे आहे. अशी चर्चा लोकांमध्ये मला सातत्याने ऐकायला मिळायची. महायुतीतलं कनेक्शन मला कुठं दिसलं नाही.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com