Devendra fadnavis : नरेंद्र मोदींसमोरच देवेंद्र फडणवीसांनी दिलं मोठं वचन, म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या...'

Devendra fadnavis Narendra Modi : राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. यासोबतच लखपती दीदीही तयार करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिले.
devendra fadnavis | narendra modi
devendra fadnavis | narendra modisarkarnama
Published on
Updated on

Devendra fadnavis News : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हमीभाव मिळत नसल्याने नाराज होता. त्यामुळे सोयाबीन, कापसाची हमीभावात खरेदी व्हावी. त्यांना अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरीहितासाठी तत्काळ निर्णय घेतला.

पंतप्रधानांच्या निर्णयाचे परिणामही दिसू लागले आहेत. सोयाबीनचे दर वाढलेत या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर शुक्रवारी विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी फडणवीसांनी आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले. तसेच यावेळी अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ करण्यात आला.

devendra fadnavis | narendra modi
Sharad Pawar And Uddhav Thackeray : 'शरद पवारांनी ठाकरेंचं 'हे' स्वप्नं धुळीस मिळवलं..'; 'या' नेत्याचा पुण्यातून मोठा दावा

फडणवीस म्हणाले, वर्ध्यातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ आणि पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे.

या एकूणच योजनांचा विचार करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र बदलणार आहे. त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकाकरिता पोहचणार आहे. जीवनात परिवर्तनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी निर्माण केली आहे. राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. यासोबतच लखपती दीदीही तयार करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना लक्षात आणून दिले.

मायक्रो ओबीसींचे जीवन बदलले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतक्या वर्षांत आमच्या लोहार, सुतार, कुंभार, सोनार, मूर्तिकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी यांचा यापूर्वीच्या सरकारने कधीही विचार केला नाही. या बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा विचार केला नाही. या सर्वांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांचा रोजगार वाढविता यावा म्हणून अर्थसहाय्य दिले. त्यांचे जीवन बदलविले, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

devendra fadnavis | narendra modi
Manoj Jarange News : बीड जरांगेंच्या पाठीशी; पुन्हा ताकद दिसली, आंदोलनं, रॅलीनंतर आता बंदही कडकडीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com