
Mumbai News : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत असताना याबाबत आता करुणा शर्मानी खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी दिला आहे मात्र सुरुवातीला ३ मार्चला राजीनामा दिला असल्याची घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, राजीनामा घेतल्याचे जाहीर करण्यास आणखी दोन दिवस लागतील असे सांगत त्यांनी राजीनामा लांबणीवर पडला असल्याचे स्प्ष्ट केले.
मी 5 मार्चपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात उपोषण करणार होते. पण मला सूत्रांनी माहिती दिली की, तुम्ही उपोषणाला बसू नका. दोन दिवस आधीच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला असून सोमवारी राजीनामा सादर होईल, असे सांगितले होते. मात्र, राजीनामा घेण्यास आणखी दोन दिवस लागतील असे सांगत त्यामुळे सोमवारी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे करुणा मुंडेंनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
करुणा शर्मा यांनी रविवारीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. '3-3-2025 को राजीनामा होगा', अशी पोस्टही करुणा शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केली होती. त्यानंतर अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी वाल्मिक कराडला तुरूंगात चहा-नाष्टाही दिला जातो, असा आरोप केला होता. दमानिया यांच्या या आरोपांवर करुणा शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दमानिया यांनी केलेलं आरोप मी ठामपणे शिक्कामोर्तब करू शकते. मी स्वत: त्या बीड जेलमध्ये 16 दिवस राहिले आहे, त्यामुळे दमानिया यांचे म्हणने खरे असल्याचा दावा करूणा शर्मा यांनी केला आहे.
बीडच्या त्या तुरूंगात मी 16 दिवस राहिले आहे, माझा नवरा माझ्यासोबत पण अर्धा-अर्धा तास बोलत होता. मी 6 दिवस अन्नही खाल्ल नव्हते, फक्त एका सफरचंदावर मी होते. तेव्हा मला जेलमध्ये असतानाही चांगल्या हॉटेलचं खाणं पाठवण्यात आले होते. धनंजय मुंडेंनी मला फोन करू सांगितले की हे फाईव्हस्टार हॉटेलचं चांगलं जेवणं पाठवलंय, तू खा हे. ते माझ्याशी अर्धा तास फोनवरही बोलायचे. त्यामुळे अंजली दमानियांनी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सोयींबद्दल जो दावा केला आहे, तो 100 टक्के बरोबर आहे. त्यांच्या आरोपांवर माझा विश्वास असल्याचे करूणा शर्मा म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांची सावली आहे, त्याच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, असा दावा त्यांनी केला. त्यासाठीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे,असे त्या म्हणाल्या. याबाबत मी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत, असे म्हणत त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.