"फडणवीसांना यापूर्वी ६ वेळा नोटीस, दंग्याची गरज नाही"; गृहमंत्र्यांनी भाजपला सुनावले

Devendra Fadnavis | Dilip Walse Patil | Mahavikas Aaghadi : फडणवीसांना नोटीस आणि चौकशीमुळे भाजप आक्रमक
Dilip Walse Patil, Devendra Fadnavis
Dilip Walse Patil, Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : पोलिस बदल्यांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काही पुरावे सादर केले होते. याबाबतचा अहवाल गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी सरकारला दिला होता. यावर सरकारने ६ महिने कोणतीही कारवाई केली नाही असा आरोपही फडणवीस यांनी केला. मात्र यावरुन गोपनीयतेचा भंग आणि टेलिग्रॅफिक अॅक्टनुसार मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली आहे.

१३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता फडणवीस यांना चौकशीसाठी बीकेसीमधील सायबर पोलिस स्थानकात बोलवण्यात आले. त्यावरुन त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपण चौकशीला जाणार असल्याचे जाहीर केले. मात्र यानंतर मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना सांगितले, तुम्ही पोलिस स्टेशनला येवू नका, आम्हीच तुमच्या घरी येतो. यानुसार आज डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी 'सागर' बंगल्यावर जावून फडणवीसांचा जबाब नोंदवला. मात्र या दरम्यान या नोटिसीमुळे आणि चौकशीमुळे भाजपने आज राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे.

याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडवणवीस यांची चौकशी आरोपी म्हणून नाही. किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनिय माहिती बाहेर गेल्यामुळे अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालातील काही माहिती पेनड्राईव्हमधून सभागृहात सादर केली होती. हिच एसआयटीमधील माहिती बाहेर कशी गेली, याबाबतची चौकशी आहे.

यासंदर्भातूनच केवळ माहिती बाहेर कशी गेली, याच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्यात आली होती. १ वर्षांपूर्वी पासूनचा हा खटला आहे. यापूर्वी जवळपास ६ वेळा त्यांना नोटीस देण्यात आली आहे. पहिली नोटीस त्यांना २१ ऑगस्ट २०२१, दुसरी ६ सप्टेंबर २०२१, ८ ऑक्टोबर २०२१, ११ नोव्हेंबर २०२१, २ मार्च २०२२, ११ मार्च २०२२ या दिवशी त्यांना नोटीस देण्यात आली. या सर्व नोटीसवर फडणवीस यांनी एकदा ही माहिती देवू असे उत्तर दिले. या नोटीसचा अर्थ समन्स नाही. किंवा त्यांना आरोपी म्हणून नोटीस नाही. त्यामुळे या संदर्भात उगाच गोंधळ करण्याची, दंगा घालण्याची गरज नाही, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

एसआयटीमधील माहिती बाहेर कशी गेली? आणि त्याला जबाबदार कोण? आरोप करण्याचा आधार काय? ते पुरावे कुठून आले? आरोपांचे सर्व पुरावे आजही तुमच्याकडे आहेत का? संबंधित आरोप सिद्ध करता येतील का? याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय माझा अभ्यास कमी असेल, पण पुन्हा मी तपासून पाहतो कि गोपनिय माहितीचा स्त्रोत न सांगण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com