विधानसभेला कनिष्ठ सभागृह म्हणून हिणवू नका ; मुनगंटिवार परबांवर संतापले..

Sudhir Mungantiwar यांनी मांडला कायदेशीर मुद्दा!
Sudhir Mungantiwar-Anil Parab News Mumbai
Sudhir Mungantiwar-Anil Parab News MumbaiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधिमंडळाचे विधानसभा सभागृह हे कनिष्ठ सभागृह आहे, असे म्हणू हिणवू नका, असा दम वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानपरिषद सभागृहात सर्व सदस्यांना दिला. महापालिकेच्या प्रभाग रचना आणि आरक्षणासंबंधी विधानसभेने मंजूर केलेले विधेयक गुरुवारी विधानपरिषद सभागृहात चर्चेला येणार आहे.

त्यावर चर्चा व्हावी किंवा कसे याबाबत सभागृहात विचार सुरु असताना (Anil Parab) अनिल परब यांनी न्यायालयाचा हवाला देत हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी कायदा विभागाचा विचार घ्यावा, असे सुचविले. (Maharashtra)

न्यायालयाने दिलेला निकाल आणि मांडण्यात येणारे विधेयक यात तफावत असल्याने याबाबत महाधिवक्त्यांचे मत घ्यावे, अशी मागणी परब यांनी केली. मात्र त्याला मुनगंटीवार यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी विरोध केला.

त्यावर, विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे त्यांनी मंजूर केलेले विधेयक या सभागृहाने मंजूर केलेच पाहिजे असे नाही, असा सूर विरोधी सदस्यांनी लावला.

Sudhir Mungantiwar-Anil Parab News Mumbai
Ambadas Danve : मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच महिला, नागरिक सुरक्षित नाहीत...

त्यावर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे असे म्हणून हिणवू नका, कारण विधानसभेने शासकीय विधेयकाला मंजुरी दिल्यानंतरच विधानपरिषद सभागृहाची निर्मिती झाली आहे. त्या सभागृहाच्या ठरावाने विधानपरिषद बरखास्तही होऊ शकते, असा इशाराच मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

अद्याप हे विधेयक मांडलेले नाही. त्यासाठी महाधिवक्त्यांचे मत विचारात घेऊन याबाबत निर्णय घेऊ, असे सांगत उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या वादावर पडदा टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com