DR.Bhagwat Karad News : देशाच्या विकासासाठी जास्त कर्ज आवश्यकच ; मंत्री कराडांनी समजावून सांगितला `अर्थ`..

PM Modi : मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा.
Dr.Bhagwat Karad News
Dr.Bhagwat Karad NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra BJP News : देशात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात देशावरील कर्जांचा डोंगर वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. (DR.Bhagwat Karad News) 2014 पुर्वी म्हणजे युपीए सरकारच्या काळातील देशावर असलेल्या कर्जाची तुलना आताच्या भाजप सरकारच्या काळाशी करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केल्या जात आहेत.

Dr.Bhagwat Karad News
Nanded BJP Politics : अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यास चिखलीकर एवढे आतुर का ?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी नाशिक मध्ये पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मात्र याचा वेगळाच `अर्थ`, पत्रकारांना समजावून सांगितला. `जास्त कर्ज म्हणजे अधिक विकास`, असे म्हणत त्यांनी देशावर असलेल्या वाढीव कर्जाचे समर्थन केले. (BJP) देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपने तर अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरूवातही केली आहे.

`विकसित भारत संकल्प यात्रे`च्या निमित्ताने नाशिक येथे असलेल्या मंत्री कराड यांना जेव्हा विरोधकांकडून मोदी सरकारच्या काळात देशावरील वाढलेल्या कर्जाबाबत विचारले तेव्हा त्यांनी वरील उत्तर दिले. (Maharashtra) देशावर कर्ज आहे, पण ते फेडण्याची ताकदही आपल्यात आहे. विकासकामे करायची असतील तर अतिरिक्त कर्ज घ्यावेच लागते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या माध्यमातून पैसा वितरणात येतो, विकासकामे होतात देशाच्या प्रगतीसाठी हे आवश्यकच आहे. केंद्राच्या गेल्यावेळच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी ११ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. यातून तीनपट रोजगार उपलब्ध होऊन उत्पन्नातही वाढ झाली होती. त्यामुळे सरकार कर्ज घेत ते देशाचा विकास साधण्यासाठी, असा दावाही कराड यांनी केला.

अमेरिका, चीन सारख्या राष्ट्रांपेक्षा भारतात महागाई कमी झाल्याचा दावा करतांनाच मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे कराड यांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था आज दहाव्या वरून पाचव्या क्रमांकावर आली आहे.

Dr.Bhagwat Karad News
Congress Manifesto Committee : काँग्रेसची 'जाहीरनामा समिती' जाहीर; महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नाही!

युपीए सरकारच्या काळात ती दहाव्या क्रमांकावर होती. पुढील दोन वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे झाल्यास भारत जर्मनी, जपानलाही मागे टाकेल, असा विश्वासही कराड यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com