

Election Food Rate Card : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, निवडणुकीतील प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी चहापान, जेवण, सभा, प्रचारासाठी वाहन, रॅली, जाहिरात आदी बाबींवर खर्च करावा लागतो. या खर्चाच्या बाबात निवडणूक आयोगाने दर निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे हे उमेदवारावर बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील विविध खर्चाचे दर सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत निश्चित केले आहेत. या दरानुसार उमेदवाराला एका चहासाठी 10 रुपये, कॉफी- 15 रुपये, पाव भाजी 60 रुपये, व्हेज थाळी स्पेशल 180 रुपये, नॉनव्हेज थाळी- 240 रुपये अन् बिर्याणीसाठी 150 रुपये खर्च करता येणार आहे.
दैनंदिन खर्चाची नोंद बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. उमेदवाराला राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडू शकतो. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्या रजिस्टरमध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च दैनंदिन नोंद बंधनकारक आहे.
बैठका, रॅली, सभा आणि जाहिराती, पोस्टर्स, वाहनांचा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. कार्यकर्त्यांना जेवणासाठी केला जाणाऱ्या खर्चाची नोंदही या रजिस्टरमध्ये करावी लागणार आहे. चहा, नाश्ता, जेवणाचे दर निश्चित केले आहेत. या दरापेक्षा कमी दर ग्राह्य धरले जाणार नाहीत.
चहा- 10, कॉफी- 15, पोहे- 20, वडापाव- 15, भजे प्लेट- 20, पाणी बाटली- 17, मिसळपाव- 60, पाव भाजी- 60, व्हेज थाळी स्पेशल- 180, नॉनव्हेज थाळी- 240, बिर्याणी- 150
फुलांचा लहान हार- 30, फुलांचा मोठा हार- 80, गांधी टोपी- 10, फेटा- 190, ढोल-ताशा (प्रतिव्यक्ती)- 500, मंडप- 15 रुपये स्क्वेअर फूट, खुर्ची (प्लास्टिक)- 10 रुपये भाडे (प्रतिदिवस), व्हीआयपी सोफा- दीड हजार रुपये, पिण्याच्या पाण्याचा टँकर- 2 हजार 200रुपये, माहितीपत्रक (A4 साईज)- एक हजारांसाठी - 4 हजार 250 रुपये
ज्या उमेदवारांना निवडणूक काळात अंगरक्षक पाहिजे आहे. त्यांना प्रत्येक दिवसासाठी एक हजार रुपये दर आकारला जाणार आहे. निवडणूक खर्चामध्ये हा खर्च धरला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदीसाठी प्रचलित दर ठरविण्यासाठी सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात बुधवारी (ता.12) दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संख्येत मोठी घट होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात ही बैठक पार पडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.