उर्जा विभागाची तत्परता! थकीत वीजबिलाच्या यादीतून अजित पवारांचे नाव २ तासात हटवलं

AJit Pawar | सर्वसामान्यांसाठी भारनियमन अन् आमदार, खासदार, मंत्र्यांकडे लाखोंची वीजबिल थकीत
Ajit Pawar | MSEB
Ajit Pawar | MSEBSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनता खंडित वीजपुरवठा आणि भारनियमानामुळे त्रस्त आहे. जिथे बिलाची वसुली कमी आहे अशा भागात भारनियमनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे लाखोंची वीज बिल थकित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकुण ३७२ लोकप्रतिनिधी ग्राहकांकडे एक कोटी २७ लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्री अशा ग्राहकांकडे असलेल्या थकित वीजबिलाची उर्जा विभागाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातुन ही माहिती समोर आली आहे. या यादीत भाजपचे (BJP) साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे (Jaikumar Gore) आघाडीवर आहेत. गोरे यांच्याकडे तब्बल ७ लाख रुपयांचे वीज बिल थकित आहे, मात्र अद्याप त्यांच्यावर उर्जा विभाग अथवा महावितरणाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याशिवाय सोलापूरचे आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे या दोन्ही भावांकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडे तब्बल ७ लाख ८६ हजारांची थकबाकी आहे.

या यादीतील आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे सुरुवातील यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाव होते. मात्र ऊर्जा विभागाकडून २ तासांमध्ये थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर करण्यात आली. या नव्या यादीत अजित पवारांचे नाव दिसून येत नाही. त्यामुळे अवघ्या २ तासांतच उर्जा विभागाने तत्परता दाखवत अजित पवार यांचे नाव या यादीतून हटवले असून, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ajit Pawar | MSEB
महागाईत होरपळ सुरुच! एका आठवड्यात LPG सिलेंडरच्या दरवाढीचा दुसऱ्यांदा दणका

कोणी किती बिल थकवले?

  • आरोग्यमंत्री राजेश टोपे - ४ लाख रुपये

  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात - १० हजार रुपये

  • कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले - २ लाख ६३ हजार रुपये

  • राज्यमंत्री विश्वजित कदम - २० हजार रुपये

  • माजी खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती - १ लाख २५ हजार रुपये

  • माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख - ६० हजार रुपये

  • आमदार जयकुमार गोरे - ७ लाख रुपये

  • माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख - २ लाख २५ हजार रुपये

  • केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे - ७० हजार रूपये

  • आमदार समाधान आवताडे एकूण - २० हजार रुपये

  • आमदार राजेंद्र राऊत - ३ लाख ५३ हजार रूपये

  • आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय शिंदे आणि कुटुंबिय - ७ लाख ८६ हजार रुपये

  • खासदार रणजितसिंह निंबाळकर - ३ लाख रुपये

Ajit Pawar | MSEB
आदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची माझी इच्छा : जयंत पाटलांनी केले कौतुक
  • आमदार संग्राम थोपटे - १ लाख रुपये

  • माजी खासदार प्रतापराव जाधव - १ लाख ५० हजार रुपये

  • आमदार सुहास कांदे - ५० हजार रुपये

  • आमदार रवी राणा - ४० हजार रुपये

  • आमदार वैभव नाईक - २ लाख ८० हजार रुपये

  • माजी मंत्री विजयकुमार गावित - ४२ हजार रुपये

  • माजी आमदार शिरीष चौधरी - ७० हजार रुपये

  • मंत्री संदीपान भुमरे - १ लाख ५० हजार रुपये

  • खासदार रजनीताई पाटील - ३ लाख रुपये

  • आमदार प्रकाश सोळंके - ८० हजार रुपये

  • आमदार संदीप क्षीरसागर - २ लाख ३० हजार रुपये

  • राज्यमंत्री संजय बनसोडे - ५० हजार रुपये

  • आमदार अशिष जयस्वाल - ३ लाख ३६ हजार रुपये

  • आमदार महेश शिंदे - ७० हजार रुपये

  • माजी मंत्री सुरेश खाडे - १ लाख ३२ हजार रुपये

  • सदाभाऊ खोत - १ लाख ३२ हजार ४३५ रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com