Pune News: मराठी वाचकांचे हक्काचे डिजिटल व्यासपीठ असलेल्या ई-सकाळ डॉट कॉमने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.जानेवारी २०२५ मधील आकडेवारीनुसार ई-सकाळ डॉट कॉम हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारी मराठी न्यूज वेबसाईट ठरली आहे.याच वर्षी ‘ई-सकाळ’ने आपल्या स्थापनेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत.
प्रतिष्ठेच्या कॉमस्कोअर क्रमवारीत ई-सकाळ डॉट कॉमने बाजी मारली आहे. कॉमस्कोअरच्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी न्यूज बेवसाईट म्हणून ई-सकाळनं अव्वल स्थान पटकावले आहे.
यंदाच्या जानेवारी महिन्यात तब्बल १.३५ कोटी युझर्सनी ‘ई-सकाळ’ला भेट दिली, ही आकडेवारी वाचकांचा विश्वास आणि प्रेम अधोरेखित करणारी आहे. वाचकांचा विश्वास आणि प्रेम अधोरेखित करणारी ही आकडेवारी आहे.
वाचकांचा भरघोस प्रतिसाद असलेल्या मराठी डिजिटल माध्यमाच्या विश्वात ‘ई-सकाळ’ने मोठी झेप घेतली आहे. सकाळ मीडिया समूहाच्या डिजिटल पत्रकारितेतील ई-सकाळने Comscore च्या अहवालानुसार, प्रमुख मराठी डिजिटल माध्यमांपेक्षा आघाडी घेतली आहे.
जानेवारी २०२५ या महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला असून त्यात ई-सकाळ डॉट कॉमला सर्वाधिक वाचकवर्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. एका महिन्यात तब्बल १.३५ कोटी युझर्सने ई-सकाळ डॉट कॉमला भेट दिली आहे.
नवनवे प्रयोग करीत बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून वाचकांपर्यंत दर्जेदार मजकूर पोचवण्यासाठी 'ई-सकाळ' नेहमीच प्रयत्नशील आहे. वाचकांनीही याच प्रयत्नांवर या निमित्ताने पसंतीची मोहोर उमटवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.