ईडी माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करेल : नवाब मलिक

नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, '' वक्क बोर्डचे काम पारदर्शक पद्धतीनं सुरु आहे. जुने कागदपत्र स्कॅन करण्याचे काम सुरु आहे. ईडी (ED) माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करेल.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

मुंबई : ''पुण्यातील वक्फ बोर्डवर ईडीचे छापे पडलेले नाहीत, एका ट्रस्टवर ईडीचा छापा पडला आहे,'' अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातील ईडीच्या छापेमारीवर मलिक यांनी स्पष्टीकरणं दिले आहे. वक्फ बोर्डावर छापे पडल्याचे वृत्त तथ्यहीन असल्याचे मलिकांनी सांगितले.

नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, '' वक्क बोर्डचे काम पारदर्शक पद्धतीनं सुरु आहे. जुने कागदपत्र स्कॅन करण्याचे काम सुरु आहे. ईडी (ED) माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करेल. वक्फ बोर्ड माझ्याकडे आल्यानंतर पारदर्शक कारभार कसा होईल, यासाठी जुन्या कागदपत्राचे स्कँन सुरु आहेत. राज्यात 30 हजार वक्फ बोर्डाच्या संस्था आहेत, त्याची ईडीनं चौकशी करावी. ईडीचे स्वागत आहे. पुणे, बदलापूर, बीड, परभणी, जालना येथे वक्फ बोर्डाकडून फसवणूक झाल्याबाबत FRI दाखल करण्यात आले आहेत.

Nawab Malik
'ते' टि्वट डिलिट करा..अन्यथा खटल्याला सामोरे जा!

''मला बदनाम करण्यासाठी ईडीचा वापर केला जात असेल तर मी घाबरणार नाही, एक कोणी भाजपचा नेता पोस्ट टाकतो, नवाब मलिकच्या घरात ईडी जाईल. मी मरणाला घाबरत नाही..ईडीने तपास करावा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. या तपासात भाजपचे कारागृहात जातील,'' असे मलिक म्हणाले.

मलिक म्हणाले, ''मुळशी (जि. पुणे) येथील ताबुत इनाम इडोमेंट ट्रस्ट ही वक्फ संस्था असून ती महाराष्ट्र वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत संस्था आहे. या वक्फ संस्थेशी संबंधीत वक्फ मिळकत सर्वे नं. ३३५/१ मधील ५ हेक्टर ५१ आर एवढी जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांनी संपादित केली आहे. या भूसंपादनासाठी रुपये ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये इतकी भरपाई रक्कम देण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी (भुसंपादन) ता. ११.१२.२०२० रोजी दिले आहेत.''

''ही जमिन वक्फ मालमत्ता असताना सुद्धा इम्तियाज हुसेन शेख (रा. येरवडा, पुणे) व त्यांचे साथिदार यांनी महाराष्ट्र वक्फ मंडळाचे बनावटी नाहरकत पत्र खोट्या सही शिक्क्यानिशी वापरून जमिनीचा मोबदला घेतला आहे. बनावट नाहरकत पत्राच्या आधारे इम्तियाज शेख व इतर काही व्यक्तींनी ता. ३० डिसेंबर २०२० रोजी रुपये ७ लाख ९८ हजार २५० रुपयांची भरपाई रक्कम देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना १३ ऑगस्ट २०२१ ला पत्र लिहिले आहे. वक्फ मंडळाच्या बनावट नाहरकत पत्राच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी इम्तियाज शेख व चांद मुलाणी यांच्याविरुद्ध बंदगार्डन पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे,'' असे मलिक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com