`फडणवीसांकडेच मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले होते; शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले`

महाविकास आघाडी सरकारला पराभूत करण्याचे अमित शहा (Amit Shah) यांचे पुण्यातून आवाहन
Cm Uddhav Thackeray - Amit Shah

Cm Uddhav Thackeray - Amit Shah

Sarkarnama

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पुण्यातून शिवसेनेला (Shivsena) टोमणे मारले. राज्यातील 2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो. मी स्वतः शिवसेनेशी संवाद साधला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूल लढवली जाणार होती आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे ठरले होते. पण नंतर शिवसेनेने वचन मोडले. सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आणि ज्यांच्याशी गेली वीस वर्षे भांडत होते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, अशी टीका शहा यांनी शिवसेनेवर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांनी नाव घेतले नाही पण सारा रोख त्यांच्यावरच होता.

Cm Uddhav Thackeray - Amit Shah

अमित शहा यांची दगडूशेठ चरणी प्रार्थना;पाहा व्हिडिओ

पुण्यात भाजपच्या बूथ संपर्क अभियानाचा प्रारंभ शहा यांच्या उपस्थितीत या वेळी करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, पक्षाचे सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.

शहा म्हणाले की मी निवडणुकीनंतर खोटे बोललो. वचन मोडले, असा आरोप ते करत होते. एक मिनिटासाठी ते खरे (उद्धव ठाकरे) बोलतात, असे मानू. पण त्या निवडणुकीत तुमच्या बॅनरवर मोदींचा फोटो किती मोठा होता, हे तरी आठवून पाहा. मोदींचा फोटो तुमच्या फोटोपेक्षा चौपट मोठा होता, याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली.

Cm Uddhav Thackeray - Amit Shah

खासदार बापटांशी बोलण्यासाठी अमित शहांनी चंद्रकांतदादांचे डोके खाल्ले..

मी आणि मोदी यांनी एकत्रित तुमच्यासोबत (ठाकरे) सभा घेतल्या. त्या सभांतही फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे आम्ही सांगितले होते. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून तुम्ही विश्वासघात केला. सत्तेवर आलात. पण सध्या येथे काय सुरू आहे? महाराष्ट्रातील आघाडी सरकार तीन चाकांची अॅटो रिक्षा असून या रिक्षाची तीनही चाके वेगवेगळ्या दिशांना जात असल्याची टीका या आधी मी केली होती. पण त्यात आता मला दुरूस्ती करावी वाटते. या रिक्षाची तीनही चाके पंक्चर असून ती रिक्षा चालत नाही, अशी टीका अमित शहांनी या वेळी केली. ही रिक्षा फक्त धूर सोडत असून प्रदूषण करत असल्याचा टोमणा मारला.

Cm Uddhav Thackeray - Amit Shah

अमित शहांसाठी शहराध्यक्ष मुळीकांच्या घरी भोजनाचा फक्कड बेत

महाराष्ट्रातील सरकार हे राज्याल अधोगतीकडे नेत असल्याचे सांगत या राज्याचे जुने वैभव हे सरकार पुन्हा मिळवून देऊ शकत नाही. हे सरकार बिनकामाचे आहे. हे सरकार घालविण्याचे काम पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालापासून सुरू झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. मोदीजींच्या नेतृत्वाची मोहीनी मतदारांवर आहे. तुम्ही केलेली काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com