Girish Mahajan On Ajit Pawar
Girish Mahajan On Ajit Pawar sarkarnama

Girish Mahajan On Ajit Pawar : अजित पवार नाराज होते ही वस्तुस्थिती; गिरीश महाजनांची खडाजंगीवर पहिली प्रतिक्रिया

Girish Mahajan reaction to Ajit Pawar controversy : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या खडाजंगी झाली. यावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Published on

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या खडाजंगी झाली. यावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अजितदादा त्यांच्या जागेवर अर्थमंत्री म्हणून, तर मी माझ्या जागेवर ग्रामविकास मंत्री म्हणून योग्य आहे. परंतु निधई वाटपावरून वाद झाला, या चर्चा खोट्या असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले.

महायुतीमध्ये अलीकडच्या काळात खटक्यांवर खटके उडू लागलेत. महायुतीमधील मंत्र्यां-मंत्र्यांमध्ये देखील वाद होऊ लागलेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे वाद होत आहेत. अर्थ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून खडाजंगी झाली. तत्पूर्वी महायुतीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार आणि भाजपमधील नेत्यांमध्ये संघर्ष दिसतो आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकर यांनी देखील भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह काही मंत्र्यांच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यातच अजितदादा आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाच्या बातम्या बाहेर आल्यानंतर महायुतीमध्ये 'कुछ तो गडबड है', असे बोलले जाऊ लागले.

Girish Mahajan On Ajit Pawar
Nana Patole : नाना पटोलेंची मोठी मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार

गिरीश महाजन म्हणाले, "अजितदादा (Ajit Pawar) निधी वाटप करताना नाराज होते. अर्थमंत्री असल्याने त्यांना राज्याचा सगळा ताळमेळ बघावा लागतो. जमेची आणि खर्चाची बाजू तपासावी लागते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 46 ते 47 हजार कोटी रुपये उभे करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शेतकऱ्यांचे वीजबिळ माफ केले आहे. त्याचा ताळमेळ देखील बसवावा लागणार आहे. जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा बोझा राज्यावर आला आहे". अजितदादांचे तुमच्या ज्या काही योजना असतील, तुमच्या विभागाची कामे असतील, त्याच्या खर्चात थोडीशी कपात करा, असे म्हणणे होते, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan On Ajit Pawar
Vijay Wadettiwar On Ajit Pawar News : 'बेटा अजित कितना खाया, सरदार..' ; विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर साधला निशाणा!

अर्थमंत्री अजितदादासमोर बाजू मांडताना निधीसाठी आग्रह का धरला होता, याची दखल बाजू बघितली पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधणीसाठी निधी मागितला होता. ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मागणी करणे म्हणजे वाद नव्हे. पणवाद झाला. खडाजंगी झाली. जमीन विकू का? अशा अर्थसत्य बातम्या आल्या. हे वस्तुस्थितीला धरून नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या कॅबिनेटमध्ये सर्वाच्च पातळीवर विचार करून, निधीचा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले. परंतु जमिनी विकू का? यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे गिरीश महाजन यांनी पुन्हा सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com