Manoj Jarange Patil : आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!

Manoj Jarange Patil warns the government to grant Maratha reservation : गेल्या पंधरा दिवसात अनेक नोंदी सापडलेल्या आहेत. पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून दिले जात नाही. सरकार आमचे ऐकत नसेल तर पहिल्या पेक्षा पाच पट जास्त लोक मुंबईला जातील.
Manoj Jarange Patil Antarwali Sarti News
Manoj Jarange Patil Antarwali Sarti NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा समाजाला हक्काचं आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला दिला. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर यांना सळो की पळो करून सोडू. ज्या दिवशी अंतरवालीत राज्यव्यापी बैठक झाली, त्या दिवशी जागा सुद्धा पुरली नाही. आता मुंबईत लोक कसे येतील हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं. 29 ऑगस्टच्या आत तुम्ही आरक्षण देऊन टाका त्यानंतर परिस्थिती हाता बाहेर जाईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे पाटील यांनी आधीच जाहीर केले आहे. कोटीच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा दावा केल्यानंतर जरांगे पाटील हे सध्या गावागावात जाऊन बैठका घेत आहेत. सगळ्यांनी मतभेद बाजूला सारून मराठा आरक्षणासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र या, असे आवाहन ते या बैठकांमधून करत आहेत. गेल्या पंधरा दिवसात अनेक नोंदी सापडलेल्या आहेत. पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून दिले जात नाही. सरकार आमचे ऐकत नसेल तर पहिल्या पेक्षा पाच पट जास्त लोक मुंबईला जातील, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सर्व पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांना आम्ही स्वतःहून फोन केले होते. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायचा आहे. त्यांच्याकडे आमचं गाऱ्हान सांगणं आमचं काम आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही जाऊन सांगा की मराठी आणि कुणबी एकच आहेत तो जीआर काढा यासाठी सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आम्ही बोलावत आहोत. एकदा जर मी 29 ऑगस्टला अंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही? असाही इशारा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.

Manoj Jarange Patil Antarwali Sarti News
Maratha Vs OBC controversy : समीर भुजबळांच्या इशाऱ्याने मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार?

शिरसाट तुम्हाला कोणी वाचवणार नाही..

संजय शिरसाट यांना सुद्धा माझं सांगणं आहे की राज्यभरातल्या मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडीटी थांबलेल्या आहेत, त्यामुळे विनाकारण तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर ओढून घेऊ नका. तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या मुलांचे प्रवेश रद्द व्हायला लागले आहेत. हे काम शिरसाट साहेब तुमच्याकडून होऊ देऊ नका. अजून वेळ गेलेली नाही जर का तुमच्या विरोधात सर्व गेले तर कोणी वाचवणार नाही, असा गर्भीत इशारा जरांगे पाटील यांनी त्यांना दिला.

Manoj Jarange Patil Antarwali Sarti News
Manoj Jarange Vs Sanjay Shirsat : संजय शिरसाट आमच्या लेकरांचं वाटोळं करतायत; 'मराठा कुणबी' रोखण्यावरून मनोज जरांगेंचा संताप

संजय शिरसाट यांना मी या संदर्भात तीन वेळेस सांगितलं आणि त्यांनी देखील माझ्यासमोर तीनदा फोन केले होते. परंतु काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की, ते तेवढ्यापुरतंच द्या म्हणतात आणि नंतर नाही म्हणतात. त्यामुळे संजय शिरसाट हे मराठ्यांशी डबल गेम खेळतील असा मला वाटलं नव्हतं. या संपूर्ण प्रकरणात मला ते जबाबदार वाटत होते मात्र, तुम्ही प्रधान सचिवांना सूचना देऊनही जर आदेश निघत नसतील तर ते योग्य नाही, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com