UPSC Results: गौरवास्पद! 'यूपीएससी'च्या निकालावर महाराष्ट्राची मोहोर; 'एवढ्या' उमेदवारांनी मारली बाजी..

Maharashtra 85 Candidates Passed In UPSC: एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे १० टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत.
UPSC Results
UPSC ResultsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी(दि.२३) दुपारी जाहीर करण्यात आला आहे. त्यात इशिता किशोरने देशात तर राज्यात कश्मिरा संखेनं पहिला क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळालं आहे. पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. मात्र, यंदाचा निकाल महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे. कारण यंदा राज्यातील एक दोन नव्हे तब्बल ८५ जणांनी परीक्षेत यश मिळवलं आहे.

यूपीएससीतर्फे भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. 24 एप्रिल ते 18 मे दरम्यान विद्यार्थ्यांच्या तीन टप्प्यात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा पहिल्या तीन स्थानांवर इशिता किशोर, गरिमा लोहिया आणि उमा हरथी या मुलींनी स्थान पटकावलं आहे. तर ठाण्यातील कश्मिरा संख्ये(Kashira Sankhe) ही विद्यार्थिनी देशात 25वी तर राज्यात पहिली आली आहे.

UPSC Results
UPSC Final Result : तिसऱ्या प्रयत्नात तुषारने मिळविले डोळे दिपविणारे यश!

यूपीएससी(UPSC)च्या परीक्षेत उत्तीर्णांमध्ये ३४५ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील असून ९९ जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. तसेच २६३ ओबीसी, १५४ अनुसूचित जाती व ७२ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. अव्वल स्थान पटकाविणारी इशिता किशोर श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रातील पदवीधर आहे. या परीक्षेत या वेळीही मुलींचाच यादीमध्ये वर्चस्व पाहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रा(Maharashtra)तील ८५ उमेदवारांनी ‘यूपीएससी’च्या या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे १० टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. हे सर्व उमेदवार आता IAS, IPS किंवा इतर सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होणार आहेत.

UPSC Results
New Parliament Inauguration: नव्या संसद भवन उद्घाटनावरून राजकीय नाट्य सुरूच; चार पक्षांचा बहिष्कार?

महाराष्ट्रातील उत्तीर्ण उमेदवार :

कश्मिरा किशोर संखे - (ठाणे) (२५),

रिचा कुलकर्णी (५४),

आदिती वर्षणे (५७),

दीक्षिता जोशी (५८),

श्री मालिये, (६०),

दाभोलकर वसंत प्रसाद (७६),

प्रतीक जराड (११२)

जान्हवी मनीष साठे- (ठाणे) (१२७)

गौरव कायंदे-पाटील (१४६)

ऋषीकेश हनुमंत शिंदे- (सांगली) (१८३)

अर्पिता अशोक ठुबे (२१४)

सोहम मनधरे (२१८)

दिव्या गुंडे (२६५)

तेजस अग्निहोत्री (२६६)

अमर राऊत (२७७),

अभिषेक दुधाळ (२७८),

श्रुतिषा पाताडे (२८१),

स्वप्नील पवार (२८७),

हर्ष मंडलिक- (मुंबई)- (३१०)

हिमांशू सामंत (३४८)

अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे - (ठाणे)- (३४९)

संकेत गरुड (३७०),

ओंकार गुंडगे (३८०),

परमानंद दराडे (३९३)

मंगेश खिलारी (३९६)

रेवया डोंगरे (४१०)

खर्डे सागर यशवंत (४४५)

सांगळे पल्लवी (४५२)

अनिकेत विजयसिंग पाटील - (जळगाव)- (४६२)

आशिष अशोक पाटील- (कोल्हापूर)- (४६३)

पाटील अभिजित तुकाराम (४७०)

शुभाली परिहार (४७३)

नरवडे शशिकांत दत्तात्रेय (धाराशिव) - (४९३)

दीपक यादव (४९५)

स्वप्नील बागल- (हिंगोली) - (५०४)

रोहित कर्दम (५१७)

प्रतिभा मेश्राम (५२७)

शुभांगी सुदर्शन केकान (सोलापूर) - (५३०)

प्रशांत सुरेश डागळे (५३५)

लोकेश पाटील (५५२)

ऋत्विक कोट्टे (५५८)

प्रतीक्षा कदम (५६०)

मानसी साकोरे (५६३)

जितेंद्र प्रसाद कीर (५६९)

सय्यद मोहम्मद उस्मान (मुंबई)- (५७०)

पराग सारस्वत (५८०)

अमित उंदिरवडे (५८१)

श्रुती कोकाटे (६०८)

रोशन केवलसिंग कछवा- (जळगाव)- (६२०)

अनुराग घुगे (६२४)

अक्षय नेर्ले (६३५)

प्रतीक कोरडे (६३८)

करण नरेंद्र मोरे (६४८)

शुभम बुरघाटे (६५७)

करण नरेंद्र मोरे- (सातारा)- (६४८)

राहुल रमेश अत्राम- (नागपूर)- (६६३)

गणपत यादव (६६५)

केतकी बोरकर (६६६)

प्रथम प्रधान (६७०)

सुमेध मिलिंद जाधव- (यवतमाळ)- ६८७

सागर देठे (६९१)

मोरे शिवहर चक्रधर (६९३)

सिद्धार्थ भांगे (७००)

स्वप्नील डोंगरे (७०७)

उत्कर्ष गुरव (७०९)

दीपक कटवा (७१७)

राजश्री देशमुख (७१९)

अतुल निवृत्तीराव ढाकणे - (बीड)- (७३७)

महारुद्र जगन्नाथ भोर (७५०)

अंकित पाटील (७६२)

विक्रम अहिरवार (७९०)

विवेक सोनवणे (७९२)

सैंदणे स्वप्नीला अनिल (७९९)

सौरभ अहिरवार (८०३)

संकेत कांबळे (८१०)

निखिल अनंत कांबळे- (पुणे)- (८१६)

गौरव अहिरराव (८२८)

अभिजय पगारे (८४४)

श्रुती उत्तम श्रोते (८५९)

तुषार पवार (८६१)

दयानंद रमाकांत तेंडोलकर (९०२)

वैशाली धांडे (९०८)

निहाल कोरे (९२२)

आरव गर्ग (९१९)

निहाल प्रमोद कोरे- (सांगली)- ९२२

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com