''ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) निष्क्रियतेमुळे स्वप्नील लोणकरचा (Swapnil Lonkar) जीव गमवावा लागला होता. त्यांनतरही या राज्य सरकारनं (State Government) नियुक्त्या दिल्या ना पदांची भरती केली गेली. अशा शब्दांत निशाणा साधत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी परीक्षा अचानक रद्द केल्याने संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन वेळी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मन:स्ताप होत असल्याचे दिसत आहे. या मुद्द्यावरुन आता गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे.
राज्यातील वेगवेगळ्या वीस विभागातील ११,३५१ पद रिक्त आहेत. मात्र राज्य सरकारने लोकसेवा आयोगाकडं फक्त ४,२६४ रिक्त पदांच्या पदभरतीची मागणी करण्यात आली आहे. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील पद २५०० च्या आसपास पद रिक्त असताना अमित देशमुखांच्या खात्यानं लोकसेवा आयोगाकडे काहीच मागणी केली नाही. हीच बोंब इतर अनके खात्यांची आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला टोला हाणला आहे.
राज्यातील प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळता का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच, स्वत:ची मुलं, नातू, आमदार खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात, पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे, अशी टिकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री उशीरा परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील जागांसाठी ही भरती परीक्षा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल मी माफी मागतो,असे राजेश टोपे यांनी नमूद केले. ज्यामुळे संपुर्ण राज्यातील परिक्षार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.