Govind Pansare Murder Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरण; उच्च न्यायालयाचा आरोपींना दणका; 'ही' याचिका फेटाळली

Crime News : येत्या चार आठवड्यांत तपासाचा पुढील अहवाल सादर करण्याचे एटीएसला आदेश...
Govind Pansare
Govind PansareSarkarnama

Govind Pansare News : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला पारदर्शी आणि जलदगतीनं चालवण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना आहे. मात्र, तरीही पुढील तपासाला विरोध करण्याचा त्यांना कोणताही अधिकार त्यांना नाही अशा शब्दांत फटकारत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आरोपींच्यावतीनं दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.

कम्युनिस्ट पक्षाचे नेते व कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांची २० फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एटीएसने या तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. आता येत्या चार आठवड्यांत तपासाचा पुढील प्रगती अहवाल सादर करण्याचे एटीएसलाआदेशही हायकोर्टानं एटीएसला दिले आहेत.

Govind Pansare
Shivaji Maharaj Statue in Mumbai : संभाजी भिडेंचा शिवस्मारकाला विरोध; म्हणाले...

गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीऐवजी एटीएसमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी पानसरे कुटुंबियांच्या वतीने उच्च न्यायालयातच करण्यात आली होती. त्यांची ही मागणी मान्य करत न्यायलयानं या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केला आहे. मात्र याप्रकरणी एसआयटीचं आरोपपत्र दाखल झाल्यानं आता मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) यात देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही.

याशिवाय प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केल्यानं खटल्यास विलंब होईल असा दावा करून विक्रम भावे आणि शरद कळसकर या दोन आरोपींनी याप्रकरणी हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळत आरोपींची बाजू ऐकण्यास असहमती दर्शविली. फरार आरोपींबाबत एटीएस (ATS) कडून होणाऱ्या पुढील तपासावर न्यायालय देखरेख ठेवणार असल्याचंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

Govind Pansare
MLC Elections : काय सांगता : आमदार सत्यजीत तांबे ? ; निकालापूर्वीच पुण्यात झळकले बॅनर..

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास नव्यानं तपास केला जाणार नाही. हा खटला पारदर्शी पद्धतीनं आणि जलदगतीनं चालवण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना असला तरीही पुढील तपासाला विरोध करण्याचा त्यांना कोणताही अधिकार त्यांना नाही. हा खटला 7 वर्षांहून अधिक काळ रखडलेला आहे. परिणामी आरोपींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी खटल्याच्या या टप्प्यावर आरोपींची बाजू ऐकता येणार नाही, मुळात त्यांना तसा कायदेशीर अधिकारच नाही असेही न्यायालयानं यावेळी म्हटलं आहे.

पुण्यात नरेंद्र दाभोलकर, कोल्हापुरात गोविंद पानसरे, धारवाडमध्ये एम. एम. कलबुर्गी तर बेंगळुरूमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर साऱ्या देशाला हादरा बसला होता. यानंतर पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा आरोप असून त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. विचारवंतांच्या हत्या झाल्याने देशभर मोर्चे, आंदोलने झाली होती, तरीही या प्रकरणातील काही आरोपी अजून मोकाटच असल्याने पुरोगामी संघटनांकडून वारंवार या विचारवंताच्या हत्येच्या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com