Shivaji Maharaj Statue in Mumbai : संभाजी भिडेंचा शिवस्मारकाला विरोध; म्हणाले...

Sambhaji Bhide News :...म्हणून कोट्यवधी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये!
Sambhaji Bhide News
Sambhaji Bhide NewsSarkarnama
Published on
Updated on

Sambhaji bhide On Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे कायम त्यांच्या रोखठोक भूमिकांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे ते कायमच वादाच्या भोवऱ्यात देखील सापडतात. मात्र, तरीही भिडे यांचे आक्षेपार्ह विधानं काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. यावेळी भिडे गुरुजी यांनी थेट सरकारच्या भूमिकेलाच आव्हान दिल्यामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. भिडे यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाला विरोध दर्शविला आहे.

संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जुन्नरमध्ये गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

भिडे म्हणाले, राज्यात नको इतके पुतळे आहेत. आता अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जात आहे. त्या स्मारकाचा आणि छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये. तसेच आमच्या छत्रपती शिवरायांना इंग्लंडच्या प्रसुतीगृहातून बाहेर काढा. त्यांची जयंती भारतीय हिंदू पंचांगानुसारच झाली पाहिजे असंही विधान संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी यावेळी केलं.

Sambhaji Bhide News
Satyajeet Tambe Banner In Pune : काय सांगता : आमदार सत्यजीत तांबे ? ; निकालापूर्वीच पुण्यात झळकले बॅनर..

भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान जुन्नरमध्ये गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रा मोहिमेत हजारो धारकरी सहभागी झाले होते.

भिडे म्हणाले, महाराष्ट्राची लेकरं राज्य करत आहेत. त्यामुळे ते नेमकं काय करतात ते बघू. सरकारं सारखी उलथीपालथी होताहेत. हा त्यांचा धंदा आहे,ते दोन्हीही आपलेच आहे. तसेच हिंदुत्वाचे जुने आणि नवे ठेकेदार म्हणविणारे देखावे आहेत असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. जगाचा बाप कोण याचं उत्तर अमेरिका, रशिया देईल. हे सगळे देश हरामखोर आहेत. जगात देवत्व आणि श्रद्धा टिकवायची असेल तर हिंदूस्तानच असला पाहिजे अशी रोखठोक भूमिकाही भिडे गुरुजी यांनी यावेळी मांडली.

Sambhaji Bhide News
Pune By-Election : 'चिंचवड'ला तीन उमेदवारी अर्ज दाखल, तर 'कसब्या'ची अजूनही पाटी कोरीच!

छत्रपती शिवरायांनी 289 लढाया तर छत्रपती संभाजी महाराजांनी 134 लढाया लढल्या. हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिलं, त्यांचं स्मरण करण्यासाठी मिरवणूका, उत्सव सोहळे करून चालणार नाही. तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे होकायंत्र समजून त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केलं पाहिजे असेही भिडे गुरुजी यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com