Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघांसाठी आज मतदान; भाजपसह आघाडीची प्रतिष्ठापणाला

Political News : सत्यजीत तांबेंसह अनेक उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद होणार...
Graduate Constituency Election Voting
Graduate Constituency Election Voting Sarkarnama
Published on
Updated on

Graduate Constituency Election Voting : शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणकीत उमेदवारीवरुन प्रमुख पक्षांची तारांबळ, बंडखोरी, कुरघोडी, माघार, मतांची जुळवाजळव, आयात उमेदवारांना संधी, नाराजीनाट्य, पाठिंब्यावरुन संभ्रम अशा एक ना अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्यातील पाचही विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधरच्या पाच मतदारसंघांत सोमवारी(दि.३०) मतदान होत आहे. या मतदारसंघातील सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. दरवेळी शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांमधील निवडणूक फारशी चर्चा होत नाही.पण यावर्षी काँग्रेसचे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यामुळे आणि भाजपनंही अखेरपर्यंत आपला उमेदवार जाहीर न करता आपल्या भूमिकेविषयी ठेवलेल्या सस्पेन्स कायम ठेवल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली होती.

सध्या विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे.

Graduate Constituency Election Voting
NCP : महिलेचे अश्रू पाहून सुप्रिया सुळे थेट पोलीस ठाण्यात; काउन्सलिंग करून मोडणारा संसार सावरला

विधान परिषदेत संख्याबळासाठी भाजपला या पाच जागा महत्त्वाच्या आहेत. परिषदेच्या सध्या २१ जागा रिक्त आहेत. ५७ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक २२ आमदार आहेत. सभापतीपद मिळविण्याकरिता भाजपने जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर दिला आहे. सध्या विदर्भातील नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर संघाच्या दोन्ही जागा कायम राखण्यासोबतच इतरही तीन मतदारसंघात विजय मिळविण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे.

अशा होणार लढती..

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पुरस्कृत सुधाकर अडबाले विरुद्ध भाजप प्रणित नागो गाणार, अमरावतीत महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे विरुद्ध भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील, कोकणमध्ये शेकाप उमेदवार बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात थेट लढती होणार आहे.

सध्या नाशिक पदवीधर काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे,अमरावतीत भाजपचे डॉ. रणजित पाटील,कोकणमध्ये शेकापचे बाळाराम पाटील, नागपूरमध्ये भाजपचे नागो गणोर, आणि औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे आमदार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत जुनी निवृत्तिवेतन योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत प्रतिकुलता दर्शविली होती. आणि हाच पदवीधरच्या निवडणुकीत मुद्दा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरू लागला तर भाजपच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला होता.

यानंतर जुनी निवृत्तिवेतन योजना हा प्रचारातील मुद्दा विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

Graduate Constituency Election Voting
Samajwadi Party : भाजपचं टेन्शन वाढलं ; सपाचं ‘ओबीसी कार्ड’, अखिलेश यांचा नवा प्लॅन !, 'ब्राह्मण-ठाकुरांना...'

नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐनवेळी माघार घेतली होती. याचवेळी सत्यजित तांबेंनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीची तातडीनं दखल घेत त्यांचं काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले. तर भाजपनं या ठिकाणी आपला उमेदवार न दिल्यामुळे भाजपचा तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीनं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता नाशिकमध्ये तांबे आणि पाटील यांच्याच थेट लढत होत आहे. यात कोण बाजी मारणार हे गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

भाजपकडून राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, नाशिक पदवीधरमध्ये भाजपने कोणालाच उमेदवारी दिली नाही. राजेंद्र विखे यांनी या मतदार संघात मोठ्या प्रमाणात काम केले होते. पक्षाने त्यांना आधी मतदार नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली. त्यानंतर पक्षाने त्यांना उमेदवारी संदर्भात विचारणाच केली नसल्याची चर्चा होती.नाशिकमध्ये आपला उमेदवार न देता, सत्यजीत तांबे यांना छुपा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.३०) २२७ केंद्रांवर मतदान होणार आहे. ६१ हजार ५२९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान साहित्यासह पथके त्या-त्या केंद्रांवर रवाना झाली आहेत. केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com