Gram Panchayat Elections Result : ''...यांनी फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोप एवढ्यावरच वर्ष घालवलं'' निकालावरून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला!

Shinde group Vs Thackeray group : '' ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांना...'' असंही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर म्हटलं आहे.
CM Shinde and Uddhav Thakray
CM Shinde and Uddhav ThakraySarkarnama
Published on
Updated on

CM Shinde News : राज्यभरात आज ग्रामपंचाय निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून या निवडणुकीत सर्वात यशस्वी ठरलेला पक्ष म्हणजे भाजप ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट आणि नंतर शिंदे गटाचा क्रमांक लागला आहे. तर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, काँग्रेस आणि शेवटी ठाकरे गटाचा नंबर असल्याचे दिसत आहे. एकूणच या निवडणुकीत महायुतीचं पारडं हे महाविकास आघीडीपेक्षा भारी ठरलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Shinde and Uddhav Thakray
Gram Panchayat Elections Result 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीत 'महायुती' सुसाट , तर महाविकास आघाडी पिछाडीवर !

याववर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबईत भाजप कार्यलयात ढोल वाजवून आणि पेढे वाटून आंनदोत्सव साजरा होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवीर आणि महायुतीच्या यशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या वेळी त्यांनी विरोधकांवर विशेषकरून ठाकरे गटावर निशाणा साधल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, '' ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. प्रसारमाध्यमांचे मनापासून आभार मानतो. महायुती सरकारने गेल्या वर्षभरात केलेली विकासकामे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने थांबवलेली कामं, प्रकल्प यास चालना देण्याचं काम आम्ही केलं.

या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आम्ही आखलं, भूमिका आम्ही घेतली. म्हणून या राज्याचा सर्वसामान्य माणूस, अगदी शेतकऱ्यापासून उद्योजकांपर्यंत, महिला-भगिनींपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी हे खऱ्या अर्थाने पोहाेचलेलं आहे आणि हे मतदारांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं आहे. प्रेम व्यक्त केलं.''

याचबरोबर ''आज आपण पाहतोय, की महाविकास आघाडीचा कितीतरी पटीने जास्त ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्य महायुतीचे आलेले आहेत. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्री म्हणून मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ आपापल्या परीने प्रत्येक भागात, जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. म्हणून आज हा निकाल आपण पाहतो आहोत,'' असंही शिंदे म्हणाले.

CM Shinde and Uddhav Thakray
Gram Panchayat Election Results : संगमनेर ग्रामपंचायत निवडणुकीत 'बाळासाहेब थोरात, लय जोरात...'

घरी बसण्याची सवय नाहीतरी त्यांना आहेच -

याशिवाय ठाकरे गटावर टीका करताना ''यांनी फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोप एवढ्यावरच वर्ष घालवलं. एकही दिवस असा सोडला नाही, की सकाळी सुरुवातीपासूनच टीका, टिप्पणी आणि टोमणे, आरोप-प्रत्यारोप हे मतदारांनी नाकारलं. ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली. ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना लोकांनीच घरी बसवलं. घरी बसण्याची सवय नाहीतरी त्यांना आहे. खऱ्या अर्थाने मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला आणि आता अजित पवारांनीही म्हणजेच या महायुतीला कौल दिला आहे, '' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी टोला लगावला.

CM Shinde and Uddhav Thakray
Gram Panchayat Election Results 2023: नाशिकमध्ये शिंदे गटासह आघाडीचे वर्चस्व!

आमची जबाबदारी आता वाढलेली आहे -

ठाकरे गटापेक्षा दुप्पट जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत, यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले हे मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे. आमची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणखी आम्ही काम करू या राज्याचा विकास करू. आणखी उद्योगधंदे आणून तरुणांना रोजगार, हाताला काम. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं जे काही धोरण आम्ही आखलेलं आहे, ते अधिक चांगल्याप्रकारे होईल. आम्हाला सर्व समाजाने पाठबळ दिलं आहे. पाठिंबा, आशीर्वाद दिले म्हणून हे शक्य झालं आहे.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com