Rural Politics News : दिल्लीपेक्षाही गावकीचं राजकारण भारी असतं, असं बोललं जातं. त्यामुळे गावचा कारभारी अर्थात सरपंच पदाची निवडही तितकीच अटीतटीची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. उद्या(५ नोव्हेंबर) राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मतदान पार पडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जनताच थेट सरपांचाची निवड करणार असून २ हजार ४८९ सरपंच निवडले जाणार आहेत. यामध्ये २ हजार ९५० सदस्य तर १३० सरपंच्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ग्रामीण भागातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान प्रक्रियेस उद्या(५ नोव्हेंबर) सकाळी ७.३० वाजता सुरूवात होईल आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. तर गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली असून, या ठिकाणची मतमोजणी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
कोकण - ३६०, उत्तर महाराष्ट्र - ४५७, पश्चिम महाराष्ट्र- ६५६, मराठवाडा -२५४ आणि विदर्भात - ६३२ जागांसाठी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.