Maharashtra Politics : पलावा उड्डाण पुलाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, राजू पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Raju Patil
Raju Patilsarkarnama
Published on
Updated on

पलावा उड्डाण पुलाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, राजू पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

कल्याण शिळ रोडवरील पलावा उड्डाणपुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून रडत खडत सुरु आहे. आगामी महामापलिका निवडणुका पाहता आता कामाने वेग धरला आहे. मात्र सात वर्षांपासून सुरु असलेल्या कामाची व्हीजेटीआय मार्फत गुणवत्ता चाचणी करून प्रमाणपत्र प्रसिद्ध करा आणि जीवनाची हमी द्या अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल आहे.

राजू पाटील म्हणाले की, एक कर्तव्यदक्ष नागरिक वेळच्यावेळी टॅक्स भरतो कशासाठी ? कधीही न सुटणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी, कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी, त्यांच्या काम चुकारपणासाठी, घाईघाईने डांबर ओतण्यासाठी, दर्जाहीन सामान वापरण्यासाठी, भेसळ करण्यासाठी, निवडणुका जवळ आल्यानंतर रखडलेली कामं जशी जमतील तशी पूर्ण करण्यासाठी आणि त्याचचं लोकार्पण करून नित्कृष्ट दर्जाची कामं जनतेच्या माथी मारण्यासाठी ? अनेक वर्षांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न... गेली 7 वर्षे चालू असलेलं बांधकाम आणि त्यात देखील होणारी दिरंगाई... मग आता कशासाठी घाई ? निवडणुकीपूर्वी लोकार्पणासाठी ? मतांच्या हव्यासापोटी मतदारांचाच जीव धोक्यात घालणार ? पूल सुरू करण्याआधीच व्हिजेटीआय मार्फत गुणवत्तेचं प्रमाणपत्र जाहीर करा... घाई नको, जीवनाची हमी द्या !

उद्धव ठाकरेंची खिल्ली उठवणारे व्यंगचित्राचे बॅनर शिंदेंच्या शिलेदाराने लावले

पुण्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी शहरातील प्रमुख भागांमध्ये भले मोठे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा वापर करण्यात आला आहे. या व्यंगचित्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका हातात कुबडी तर दुसऱ्या हातामध्ये ऑक्सिजनचा ,टॅंक पाहायला मिळत आहे तसेच या ऑक्सिजनच्या टँकवर काँग्रेस पक्षाच्या चिन्ह असलेलं हातात निशाण पाहायला मिळत आहे.

USA attacks iran : शेवट आम्ही करू, इराणची अमेरिकेला धमकी

अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांना टार्गेट करत हल्ले केले. या हल्ल्यानंतर इराणने आपल्या सरकारी वाहिनीवरून अमेरिकेला धमकी देत म्हटले की, 'सुरुवात तुम्ही केली आहे. मात्र, शेवट आम्ही करू. प्रत्येक अमेरिकन जवान आमचं लक्ष्य असेल.

रुपाली चाकणकरांनी पुणे ते दिवेघाट करणार पायी वारी

रूपाली चाकणकरांनी पुणे ते दिवेघाट केली पायी वारी करणार आहेत. त्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीत सहभागी झाल्या आहेत. यावेळी महिला आयोगाच्या माध्यमातून वारकऱ्यांना केलेल्या सुविधांचा रूपाली चाकणकरांनी घेतला आढावा

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळीच मतदान केले.

USA attacks iran : मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, तीन अणुस्थळांना केले टार्गेट

इराण-इराकच्या वाढत्या तणावात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने थेट इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ले केले. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने हल्ला केला असून याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिली आहे. आपल्या सोशल मीडियावर माहिती देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हा हल्ला यशस्वी झाला आहे. सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. योद्धांचे अभिनंदन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com