Maharashtra Live Updates : जलसंधारणासाठी एक लाख कोटी; मंत्री विखे पाटील यांची माहिती
Radhakrishna Vikhepatil : जलसंधारणासाठी एक लाख कोटी; मंत्री विखे पाटील यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार करण्यासाठी आगामी चार ते पाच वर्षात गोदावरी, प्रवरा खोर्यातील दुष्काळी भागाला पाणी पोहोचविले जाणार आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सिन्नर, संगमनेरच्या दुष्काळी भागाला पाणी पोहोचविल्याने निळवंडेवर जो ताण आला आहे, तो भंडारदऱ्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे कमी होईल. यासाठी आगामी काळात जलसंधारण प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.
Shivsena Vs NCP : रायगडात शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर प्रमोद घोसाळकरांनी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी फोडत असल्याचा आरोप केला. घोसाळकरांच्या आरोपांमुळे शिवसेनेचे राजीव साबळे संतापले असून, कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची भूमिका घेतली आहे.
Manoj Jarange : 'आरक्षण दिलं नाही, तर यांना सळो की पळो करून सोडणार'; मनोज जरांगेंचा इशारा
'मरू पण, विजयच घेऊन येऊ. तसा मोकळ्या हाताने माघारी येणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मराठ्यांना (Maratha) मी आता एकच आव्हान करतो की मतभेद आणि मनभेद असतील तर ते सोडून द्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी फक्त दोनच दिवस मुंबईला या. यांनी आरक्षण दिलं नाही, तर यांना सळो की पळो करतो. आंतरवालीत राज्यव्यपी बैठकीवेळी जागा सुद्धा पुरली नाही, आता मुंबईत लोक कसे येतील, हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं', असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.
Sambhaji Brigade : माझ्या हत्येचा कट होता; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
काळे फासण्याची घटना घडल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आता आक्रमक झाले आहेत. प्रवीण गायकवाड यांनी सुरवातीला आताच बोलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. परंतु माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवधर्म फाऊंडेशनने माझ्यावर काळे टाकले, माझ्या हत्येचा कट होता, असा गंभीर आरोप केला. शिवधर्म फाऊंडेशनने गायकवाड यांना काळे फासल्याने राज्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.
Harshwardhan Sapkal : हल्लेखोर झुंडीवर 'जनसुरक्षा'नुसार कारवाईची तरतूद आहे का? सपकाळांनी टायमिंग साधत CM फडणवीसांना प्रश्न
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सावल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, आणि बहुजन समाजासाठी झटणाऱ्या प्रवीणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. मुख्यमंत्री फडणवीस “महाराष्ट्र आता थांबणार नाही”म्हणाला होतात, आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का?, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या झुंडीवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणेची काही तरतूद आहे का? असेल तर त्याअंतर्गत कारवाई करून आदर्श घालून द्या! महाराष्ट्र पाहतोय, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
Radhakrishna Vikhepatil : मंत्री विखे पाटलांच्या हस्ते श्रीरामपूर 'एमआयडीसी'मध्ये उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन
'श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण 220/33 केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होईल आणि तालुक्यातील नवीन उद्योगांना चालना मिळेल', असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये 59 कोटी 62 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
Sambhaji Brigade : शिवधर्म फाऊंडेशनच्या कृत्याला योग्यवेळी प्रत्युत्तर; प्रवीण गायकवाड यांचा इशारा
काळे फासण्याची घटना घडल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. प्रवीण गायकवाड यांनी या प्रकारावर मी आत्ता बोलणार नाही. योग्यवेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडेल, असे सांगितले. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी डोळ्याची तपासणी देखील केली.
Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड यांची स्वकीयांविषयी आली खदखद बाहेर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी स्वकीयांविषयी खदखद व्यक्त केली आहे. मंत्री संजय राठोड म्हणाले, "विधानसभेची पाचव्यांदा निवडणूक लढताना निवडून आलो पाहिजे, अशी अनेकांची भावना असताना, विरोधकांनी तर विरोध केला. मात्र, आपल्या काही सहकाऱ्यांनी पुढे गेला नाही, पाहिजे यासाठी काम केले होते". पाचव्यांदा निवडून आला, तर तो आवरणार नाही, अशी खदखद मंत्री राठोड यांनी वाशिम इथ बंजारा भाषेतून व्यक्त केली.
Sambhaji Brigade Vs Shivdharma Foundation : संभाजी ब्रिगेडचा हिंदुस्थान फाऊंडेशनला जशास तसं उत्तर देणार...
संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा व शाईफेकीचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला आहे. सरकारने अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्ही भ्याड हल्ल्याचं उत्तर देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.