Sarkarnama Updates : ...तर भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येणार, एटीएसची पडघामध्ये धाड - वाचा महत्वाच्या घडामोडी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On EVM : महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालला पाठवणार -संजय राऊत

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. यावर बोलताना अमित शाहांच्या दाव्यात तथ्य आहे कारण महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालला पाठवण्यात येणार आहेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आयुक्त नवल किशोर राम यांची भेट

चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी घेतली पुणे महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. प्रभागरचना आणि निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांवर चंदकांत पाटील यांची नवल किशोर राम यांच्याशी चर्चा गेल्या ३ वर्षांपासून नगरसेवक नसल्याची खंत, चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांना बोलून दाखवली.

राज्यमंत्री अधिकारा विना, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

मंत्रिपदाचे वाटप होऊन चार महिने झाले तरी राज्यमंत्र्यांना अधिकार मिळाले नाहीत. कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना अधिकार देत नसल्याची चर्चा आहे. आपल्याला काहीच अधिकार नसल्याचे सांगत काही राज्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.

ATS : एटीएसची पडघामध्ये धाड, संशयिताच्या घराची झडती

ठाण्यातील पडघामध्ये महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाशी संबंधित प्रकरणात छापेमारी केली. एटीएसने ३००३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सिमी या संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचन याच्या घराचीही झडती घेतली. साकिब नाचन याने २०१७ मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा संशय एटीएसला आहे. 

रस्त्यावर मासे पकडून काँग्रेसचे अभिनव आंदोलन

आळंदी रोड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बीआरटीबस्टॉप चौकात ठेकेदारने वाहतूक विभागाची परवानगी न घेता ड्रेनेजचे काम तर केले. या कामाने रस्ता नादुरस्त झाला आहे. रस्त्यावरील खड्डे देखील तसचे आहेत. त्यामुळे काँग्रेसचे वडगावशेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी त्या तुटलेले ड्रेनेज वर बसून प्रतिकात्मक भ्रष्टाचाराचे मासे पकडून वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. तसेच ड्रेनेज पुन्हा दुरुस्त करा अशी मागणी केली.

Astrolabe found at Raigad : किल्ले रायगडावर सापडले 'यंत्रराज'

दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती देत यंत्रराजचा फोटो देखील शेअर केला आहे.

खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे, असे संभाजीराजे म्हणाले. प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे 'Astrolabe'. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात.

अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.

MIM movement in Akola : जन्म प्रमाणपत्र रद्द प्रकरणी एमआयएम आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

अकोला शहरातील रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा प्रमाणपत्र मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, यावर तातडीने तोडगा न काढल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा एमआयएमने दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com